लसीकरण मोहिमेत भाजपने राजकारण करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST2021-04-11T04:04:42+5:302021-04-11T04:04:42+5:30
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील लसीकरण कार्यक्रमात भाजप नेते स्थानिक आमदाराचे फोटो लावून यात राजकारण करू पाहत आहेत. या मतदार ...

लसीकरण मोहिमेत भाजपने राजकारण करू नये
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील लसीकरण कार्यक्रमात भाजप नेते स्थानिक आमदाराचे फोटो लावून यात राजकारण करू पाहत आहेत. या मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांनी कोरोना उपाययोजनेबाबत तालुक्याचा दौरा केला नाही की आढावा घेतला नाही. त्यामुळे आधी त्यांनी घराबाहेर पडून जनतेचे गाऱ्हाणे ऐकावी, मदत करावी, असा सल्ला खोचक सल्ला मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिला.
चव्हाण यांनी वेरूळ, बाजार सावंगी येथील आरोग्यकेंद्रांना भेट दिली; तर खुलताबाद कोविड सेंटरचा आढावा घेतला. बाधित रुग्णांशी संवाद साधून अडचणी सोडविल्या. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी आमदार बंब यांच्यावर टीका करून त्यांनी रस्त्यावर उतरून काम करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी सभापती महेश उबाळे, राष्ट्रीय कॉग्रेस शहराध्यक्ष मुजीबोद्दीन, रावसाहेब फुलावे, निसार पठाण, सरपंच ज्ञानेश्वर मातकर, गजानन फुलारे, ज्ञानेश्वर दुधारे, आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : खुलताबाद कोविड सेंटरची पाहणी करताना आमदार सतीश चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी.