भाजपचा शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:00 IST2017-10-08T00:00:30+5:302017-10-08T00:00:30+5:30

‘भाजप महापौर निवडणुकीत उमेदवार देणार नाही’ मथळ्याखाली ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मनसुब्यावर अक्षरश: पाणी फेरले गेले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांची भेट घेतली. त्यांनी महापौर निवडणुकीनिमित्त अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.

BJP responds positively to Shiv Sena | भाजपचा शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद

भाजपचा शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘भाजप महापौर निवडणुकीत उमेदवार देणार नाही’ मथळ्याखाली ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मनसुब्यावर अक्षरश: पाणी फेरले गेले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांची भेट घेतली. त्यांनी महापौर निवडणुकीनिमित्त अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.
महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाळ २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवडणूक घेण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवसेना-भाजप युतीमधील करारानुसार यंदा महापौरपद अडीच वर्षांसाठी सेनेकडे आहे. शिवसेनेने निवडणुकीच्या एक महिना अगोदरच महापौरपदाचे उमेदवार म्हणून ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांच्या नावाची घोषणा केली. मागील काही दिवसांपासून भाजपमधील काही इच्छुक नगरसेवक युती तोडण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. युती तुटत नसल्याने इच्छुकांनी भाजप स्वतंत्र उमेदवार उभा करणार असल्याचे प्रचार सुरू केला होता. भाजपच्या या प्रचारतंत्राला ब्रेक लावण्याचे कामही सेनेने केले. सेनेने युतीधर्म पाळत महापौरपदाचा उमेदवार घोषित केला. उपमहापौरपदासाठी घोषणा केली नाही. उपमहापौरपदी कोणाची वर्णी लावावी याचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवून देण्यात आला. त्यातच ‘लोकमत’ने विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप युतीधर्म पाळणार असल्याचे वृत्त शनिवारी प्रकाशित केले. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. महापौर निवडणुकीसाठी आकड्यांचे गणित मोडत बसणाºयांची कोंडी झाली.
शनिवारी सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर शहरात दाखल झाले. त्यांनी भाजपचे स्थानिक नेते माजी महापौर भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रवक्ते शिरीष बोराळकर यांची भेट घेतली. घोसाळकर यांच्यासोबत राजू वैद्य, घोडेले आदींची उपस्थिती होती. भाजप नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच घोसाळकर हे रावसाहेब दानवे, आ. अतुल सावे यांचीही भेट घेणार आहेत.

Web Title: BJP responds positively to Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.