बारा आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST2021-07-07T04:05:57+5:302021-07-07T04:05:57+5:30
बापू घडमोडे, विजय औताडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, फुलंब्रीचे सुहास शिरसाट, माधुरी अदवंत, ...

बारा आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने
बापू घडमोडे, विजय औताडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, फुलंब्रीचे सुहास शिरसाट, माधुरी अदवंत, साधना सुरडकर, प्रतिभा जऱ्हाड, अमृता पालोदकर, राजू शिंदे, समीर राजूरकर, राजेश मेहता, शिवाजी दांडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यात राज वानखेडे, प्रशांत देसरडा, जालिंदर शेंडगे, महेश माळवतकर, मनोज भारस्कर, मनीषा मुंडे, सागर पाले, दौलत खान पठाण, सचिन करोडे, सुमित्रा गावंडे, सुवर्णा धानोरकर, वंदना शहा, संजय फतेलष्कर, बालाजी मुंडे, अरविंद डोणगावकर, बबनराव नरवडे सहभागी झाले होते.
१२ आमदारांची निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेस तोंड देण्याची हिंमत सरकारने दाखवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गमावले असून हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी राज्यात संघर्ष करतच राहील, असा इशारा घडमोडे यांनी दिला.