शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या स्वागताचे होर्डिंग बंजारा ब्रिगेडने फाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 18:36 IST

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ भाजप लढणार असून, सभेला सहा विधानसभेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपप्रेमी, नागरिक उपस्थित राहतील, अशा व्यवस्था केली आहे.

औरंगाबाद: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या आज सायंकाळी होणाऱ्या सभेपूर्वी हायकोर्टासमोरील चौकात लावलेले स्वागताचे होर्डिंग बंजारा ब्रिगेडकडून फाडण्यात आले. या होर्डिंगमुळे संत सेवालाल महाराज चौकाचा नामकरणाचा फलक झाकला गेला होता, त्यामुळे बंजारा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आज दुपारी होर्डिंग फाडल्याची माहिती आहे. 

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. याच एकभाग म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आज सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी ५.३० वाजता सभा होणार आहे. भाजप लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार आहे. सभेच्या तयारीसाठी अत्यंत कमी दिवसाचा कालावधी मिळाला असला तरी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने शहरात चांगली वातावरण निर्मिती केली आहे. शहरातील चौकाचौकात राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. जालना रोडवर देखील नड्डा यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लागण्यात आले आहेत. दरम्यान, हायकोर्टासमोरील भाजपच्या सभेचे होर्डिंग हे संत सेवालाल महाराज चौकाच्या नामकरण फलकाच्या समोर लावण्यात आले होते. त्यामुळे तो फलक झाकला गेला. हा प्रकार निदर्शनास आल्याने बंजारा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ समोरील होर्डिंग फाडले. 

असा असेल नड्डांचा दौरा अध्यक्ष नड्डा २ जानेवारी रोजी घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जातील. त्यांच्या हस्ते वेरूळ येथील अहिल्यादेवी कुंडाच्या सौंदर्यीकरणाचा व साउंड व लाईट शोच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तेथून ते सभेसाठी शहरात येतील. सभेनंतर वैजापूर, कन्नड, गंगापूर व शहरातील तीन अशा सहा मतदारसंघांतील भाजप कोअर कमिटीची ते बैठक घेतील. नंतर शहरातील महत्त्वाच्या नागरिकांशी ते चर्चा करणार आहेत. 

शिवसेनेकडे असलेल्या जागांसाठी जोरदार तयारी महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं लोकसभा सदस्य असलेलं राज्य आहे. त्यामुळे, भाजपचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. राज्यात शिवसेनेकडे असलेल्या १८ जागांसाठी भाजप व्यूहरचना आखत आहे. देशात भाजपने ४०० जागा लढविण्याचा निश्चय केला आहे. त्याचे नियोजन म्हणून अनेक केंद्रीय मंत्र्यांना विविध लोकसभा मतदारसंघ संघटनात्मक मजबुतीसाठी वाटून दिले आहेत. मराठवाड्यात औरंगाबादसह, हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा लढवण्यासाठी भाजप पूर्णपणे संघटनात्मक तयारी करीत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादj. p. naddaजे. पी. नड्डाBJPभाजपा