शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, शिवसेनेत ‘समांतर’ राजकारण

By admin | Updated: January 6, 2015 01:12 IST

औरंगाबाद : भाजपाने समांतर जलवाहिनीच्या योजनेतील करारावर विशेष सभा घेण्याची मागणी करण्यासाठी महापौर कला ओझा, नगरसचिवांना पत्र देण्याची भूमिका सोमवारी स्पष्ट केली

औरंगाबाद : भाजपाने समांतर जलवाहिनीच्या योजनेतील करारावर विशेष सभा घेण्याची मागणी करण्यासाठी महापौर कला ओझा, नगरसचिवांना पत्र देण्याची भूमिका सोमवारी स्पष्ट केली, तर शिवसेनेने सुभेदारी विश्रामगृहावर काही नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीची विशेष बैठक घेतली. सत्ताधारी युतीमध्येच ‘समांतर’ वरून राजकारण पेटले असून जनतेला पाणीपुरवठा वेळेत होणार की नाही. याचे उत्तर मात्र अजूनही मिळालेले नाही. स्थायी समिती सदस्यांनी विशेष सभेची मागणी केली आहे; परंतु त्यावर महापौरांनी विचार केलेला नाही. शिवसेनेची विशेष बैठक झाल्यामुळे विशेष सभा होणार की नाही. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. योजनेमुळे जनता वेठीस धरली जात आहे. त्यामुळे करारातील सर्व तरतुदी, अटी, शर्तींवर चर्चा होण्यासाठी महापौरांनी विशेष सभा घ्यावी यासाठी पत्र देण्यात येईल. असे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बोराळकर म्हणाले, समांतर जलवाहिनी योजनेसाठी विशेष सभा झाली पाहिजे. लोकांना कळाले पाहिजे की, त्यांच्यावर कशाचा बोजा पडणार आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे. भाजपा जनतेच्या बाजूने राहणार आहे. राजू शिंदे हे सभापती असताना योजनेचा करार झाला आहे. मग आज होणारा विरोध निवडणुकीच्या तोंडावर आहे का? यावर बोराळकर म्हणाले, त्यावेळी फक्त बेसिक माहिती देण्यात आली. करार वेगळाच झाला, योजनेला ग्लॅमर देण्यात आले. अधिकाऱ्यांनी नंतर करारात काय केले हे समोर आलेले नाही. सध्या केंद्र, राज्यात भाजपाचे सरकार आहे. शासनाला पीपीपी रद्द करून निधी आणण्यासाठी पुढाकार घेऊ. जनता वेठीस धरली जाईल, अशी योजना काय कामाची, असा सवाल त्यांनी केला. माजी आ. किशनचंद तनवाणी हे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजपाच्या शिष्टमंडळासोबत आले होते. तनवाणी म्हणाले, योजनेतील सर्व तरतुदी समोर आल्या पाहिजेत. आयुक्तांच्या भेटीपूर्वी भाजपा नगरसेवकांची विकासकामे रखडल्यामुळे उपमहापौर संजय जोशी यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी माजी महापौर डॉ.भागवत कराड, शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती.