खर्चात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर !

By Admin | Updated: October 14, 2014 00:33 IST2014-10-14T00:27:39+5:302014-10-14T00:33:02+5:30

उस्मानाबाद : उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ निवडणूक आखाड्यात एकूण २० उमेदवार आहेत. या उमेदवारांचा प्रचारावर एकूण ३४ लाख ७६ हजार ५०८ रुपये इतका खर्च झाल्याचे

BJP, NCP on the expenditure! | खर्चात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर !

खर्चात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर !


उस्मानाबाद : उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ निवडणूक आखाड्यात एकूण २० उमेदवार आहेत. या उमेदवारांचा प्रचारावर एकूण ३४ लाख ७६ हजार ५०८ रुपये इतका खर्च झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये भाजपाचे उमेदवार संजय पाटील दूधगावकर यांनी सर्वाधिक ७ लाख ९१ हजार ७७४ लाख रुपये खर्च केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी ७ लाख ८ हजार ६६७ रुपये खर्च केला आहे.
मतदार संघातील वीसही उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे खर्च सादर केला आहे. यामध्ये शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर यांनी ५ लाख १९ हजार ६१५, बीएसपीचे जयराम बळीराम घुले यांनी २ लाख २७ हजार ८४७, काँग्रेसचे विश्वास शिंदे यांनी ३ लाख ६९ हजार ३५५, मनसेचे संजयकुमार यादव यांनी २ लाख १३ हजार ७४६, एमआयएमचे अकबरखान गुलाबखान पठाण यांनी ३ लाख ७३ हजार ४६५, अनिल उत्तमराव हजारे यांनी २१ हजार ३५०, उमेश शिवाजी भालेराव ५ हजार २००, धनंजय मुरलीधर तरकसे १४ हजार २२६, मधुकर गायकवाड १७ हजार ५३१, डॉ. रमेश सुबराव बनसोडे १३ हजार ३८०, अनंत चोंदे १ लाख १३ हजार १०५, राजाभाऊ ओव्हाळ ५ हजार ९४६,, किरण दिगंबर टकले १२ हजार ६०, बालाजी बापूराव तुपसुंदरे ५ हजार ३००, पांडूरंग गणपतराव भोसले १० हजार ६००, प्रदीप जाधव १३ हजार ७५, पोपट ग्यानबा रणदिवे ८ हजार ८८६ तर हजीभाई हन्नुरे यांनी २९ हजार ५०० रुपये खर्च झाल्याचे निवडणूक विभागाला सादर केले आहे. एकूण उमेदवारांच्या खर्चाचा आकडा ३४ लाख ७४ हजार ५०८ रुपये इतका आहे. (प्रतिनिधी)
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मधुकरराव चव्हाण यांनी सर्वाधिक ७ लाख ५७ हजार २४२ रुपये तर शिवसेनेचे सुधीर पाटील यांनी ७ लाख ५५ हजार ५२० रुपये इतका खर्च झाल्याचे दर्शविले आहे. तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जीवनराव गोरे असून, त्यांनी ४ लाख ८८ हजार ७९७, बहुजन समाजवादी पार्टीचे प्रमोद बळवंतराव ढोरनाळीकर ११ हजार १७५, मनसेचे देवानंद रोचकरी यांनी ४ लाख १५ हजार २४७, महाराष्ट्र विकास आघाडीचे सतीश कसबे यांनी ३५ हजार ३३७, भारतीय जनता पार्टीचे संजय निंबाळकर यांनी ४ लाख ३३ हजार ६५९, हिंदुस्थान जनता पार्टीचे राहुल नागनाथ चव्हाण यांनी २५ हजार ७००, किरण भगवानराव जाधव ३९ हजार ६००, पिंटू पांडूरंग चांदणे १७ हजार ४२०, अ‍ॅड. रामेश्वर धोंडीबा शेटे ४६ हजार ७६५, संजय सुरेश रेणूके १८ हजार १६० तर सुबरबाई शिवाजी राठोड यांनी ६७०३८ रुपये खर्च दाखल झाल्याचे निवडणूक विभागाला सादर केले आहे.

Web Title: BJP, NCP on the expenditure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.