भाजपचे राज्यातील सर्व खासदार एकाच दिवशी लातूर दौऱ्यावर
By Admin | Updated: May 11, 2016 00:22 IST2016-05-11T00:18:13+5:302016-05-11T00:22:02+5:30
लातूर : भाजपच्या वतीने लातुरात जलजागरण सभेचे आयोजन करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची लातूर येथे रविवार १५ मे रोजी टाऊन हॉलवर सभा आयोजित करण्यात आली आहे.

भाजपचे राज्यातील सर्व खासदार एकाच दिवशी लातूर दौऱ्यावर
लातूर : भाजपच्या वतीने लातुरात जलजागरण सभेचे आयोजन करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची लातूर येथे रविवार १५ मे रोजी टाऊन हॉलवर सभा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय त्याच दिवशी भाजपचे राज्यातील सर्व खासदार प्रत्येक जिल्हा परिषद गटांत फिरुन जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नागनाथ अण्णा निडवदे आणि शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, भाजप सरकार लातूरच्या पाण्यासाठी संवेदनशील होते. त्यामुळेच लातूरला रेल्वेने पाणी मिळू शकले. आता लातूरच्या पाणीटंचाईवर कायमची मात व्हावी यादृष्टीने भाजप पुढाकार घेणार आहे. शहरातील ५० हजार घरांनी जलपुनर्भरण करण्यासाठी आणि ५० हजार वृक्ष लागवडीसाठी पक्ष पुढाकार घेईल. या मोहिमेसाठी रविवारी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची सायंकाळी सहा वाजता टाऊन हॉलवर सभा होणार आहे. या पत्रकार परिषदेला शैलेश गोजमगुंडे, गुरुनाथ मग्गे, मोहन माने, प्रविण कस्तुरे, प्रदीप मोरे, विवेक बाजपेयी आदींची उपस्थिती होती.