शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार प्रशांत बंब यांचा नृत्याविष्कार व्हायरल; कार्यकर्ता मेळाव्यात केला तूफान डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:49 IST

गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे भाजपा आ. प्रशांत बंब यांनी गुरूवारी म्हैसमाळ येथे कार्यकर्त्यांचा स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

- सुनील घोडकेखुलताबाद: गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांचा कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळ्यातील नृत्याविष्काराचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. गुरुवारी रात्री म्हैसमाळ येथील कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे.

गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे भाजपा आ. प्रशांत बंब यांनी गुरूवारी म्हैसमाळ येथे कार्यकर्त्यांचा स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दुपारी २ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होता. यात रात्री ७ वाजेपासून आर्केस्ट्रा सुरू होता. यावेळी आमदार बंब देखील स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी स्टेजवर जात 'खाई के पान बनारस वाला' या गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या डान्स स्टेप पाहून सारेच अवाक झाले. आमदार बंब यांच्या नृत्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

महाविकास आघाडीकडून गुरुवारीच केली होती टीकाअतिवृष्टीने शेतकऱ्यांची पीके पाण्यात असून, अनेक ठिकाणी पीके आडवे झाली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे, तालुक्यात चिखलमय रस्त्यातून बैलगाडीतून मृतदेह नेण्याची वेळ नातेवाईकांना आली आहे, या पार्श्वभूमीवर आमदार बंब यांना शेतकरी व मतदारसंघातील जनतेशी काही घेणे देणे नसल्याचा आरोप महाविकास आघाडीचे कृष्णा डोणगावकर, किरण डोणगावकर, विलास चव्हाण, डॉ ज्ञानेश्वर नीळ यांनी गुरूवारी खुलताबाद तहसील कार्यालयात केलेल्या निदर्शनात केला होता. त्यानंतर आ. प्रशांत बंब यांचा म्हैसमाळ येथील गुरूवारी रात्री आयोजित आर्केस्ट्रात नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मतदारसंघात उसटसुलट चर्चा सुरू आहे.

दुसऱ्या भाजपा आमदाराचा डान्स व्हिडिओ व्हायरलआर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ठेका धरल्याचा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे भाजपा आ. प्रशांत बंब यांचा कार्यकर्ता मेळाव्यातील डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Prashant Bambप्रशांत बंबBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद