भाजप सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
By Admin | Updated: August 1, 2014 01:05 IST2014-08-01T00:43:34+5:302014-08-01T01:05:37+5:30
बीड : जिल्हा परिषदेमध्ये विविध विकास कामात कोट्यवधी रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप करीत गुरुवारी भाजपचे सदस्य जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना भेटले़
भाजप सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
बीड : जिल्हा परिषदेमध्ये विविध विकास कामात कोट्यवधी रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप करीत गुरुवारी भाजपचे सदस्य जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना भेटले़
तेरावा वित्त आयोग, झेडपीआर या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप सदस्यांनी केला़ रस्ते, नाल्या, बंधारे यांची बोगस कामे केल्याची कैफियतही सदस्यांनी मांडली़ याशिवाय सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त ९ महिने उलटले तरीही दिले गेले नाही़ अधिकारी आणि सत्ताधारी यांच्यात संगनमत असून कोणाचाच कोणाला पायपोस राहिला नाही, असा आरोप भाजपचे गटनेते मदनराव चव्हाण यांनी केला़ तेराव्या वित्त आयोगातून किती कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या, याची कोठलीच नोंद जि़ प़ मध्ये नाही़ त्यामुळे सर्व कामांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ जि़ प़ सदस्य दशरथ वनवे, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, प्रदेश सदस्य कल्याण आखाडे, सुभाष धस, सुरेश उगलमुगले, भगीरथ बियाणी, सर्जेराव तांदळे, शेख फारुक उपस्थित होते़ याबाबत अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्याशी संपर्क झाला नाही़ उपाध्यक्षा अर्चना रमेश आडसकर म्हणाल्या, प्रशासकीय मान्यता सीईओंना त्यांच्या अधिकारात दिलेल्या आहेत़ अनियमितता झाली असे म्हणता येणार नाही़ सर्व सदस्यांना झेडपीआरमधून कामे मिळालेली आहेत़ प्रोसेडिंग द्यायला हवे होते हे खरे आहे़ (प्रतिनिधी)