शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असंही मुख्यमंत्री म्हणतील'; फडणवीसांचा औरंगाबादमध्ये हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 20:13 IST

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय ना मग औरंगाबादला संभाजीनगर समजा. उद्या ते म्हणतील की दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

औरंगाबाद-

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय ना मग औरंगाबादला संभाजीनगर समजा. उद्या ते म्हणतील की दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते औरंगाबादमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या जलआक्रोश मोर्चात बोलत होते. औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्याचा मुद्दा तापला असून यावरुन नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेवर भाजपानं धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे. 

"हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण 

देवेंद्र फडणवीसांनी मोर्चात संबोधित करताना ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. "औरंगाबादमधली आजची लढाई ही परिवर्तनाची लढाई नाही. परिवर्तन तर होणारच आहे. पण ही लढाई व्यवस्था परिवर्तनाची आहे. आजचा मोर्चा भाजपाचा नाही. हा मोर्चा जनतेचा मोर्चा आहे. जनतेचा आक्रोश आहे. जनतेच्या आक्रोशाला संघटीत करण्याचं काम भाजपानं केलं आहे. थेंब थेंब पाण्यासाठी संभाजीनगरचा माणूस तरसलेला आहे. अशावेळी आम्ही शांत बसू शकत नाही. मी सरकारला इशारा देतो हा संघर्ष तेव्हाच संपेल जेव्हा इथं पाणी पोहोचेल. तोवर सरकारला रात्रीची झोप लागू देणार नाही", असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

"आमच्या मुख्यमंत्र्यांना जर सांगितलं की आमच्याकडे पाणी येत नाही. तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाहीत. त्यांनी तर सांगितलं की मी म्हणतो म्हणजे सत्य समजा. मी म्हणतो तर संभाजीनगर समजा. मी म्हणतो म्हणून बेफिकीर समजा. दगडाला सोन्याची नाणी समजा. नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा", अशा कवितेच्या पंक्तीतून फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

"यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

पोस्टर फाडाल पण आक्रोशाचं काय?शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या जलआक्रोश मोर्चाचं पोस्टर फाडल्याच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. "मला आज कळलं की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमचे पोस्टर फाडले. पण एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही पोस्टर फाडू शकता पण जनतेचा आक्रोश कसा थांबवणार? जेव्हा माझी माय माऊली मनातल्या मनात तुम्हाला शिव्याशाप देते तेव्हा तुम्ही बुडल्याशिवाय राहणार नाही. संभाजीनगरनं आज महाराष्ट्राला हलवून टाकलं आहे. आता मागे हटणार नाही. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोवर भाजपा झोपणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही. सरकारची कुंभकरणी झोप उघडली नाही तर सरकारला कुणी वाचवू शकणार नाही", असं फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री 'त्या' आजींच्या घरी जाणार का?"मला कुणीतरी सांगितलं की आजच्या जलआक्रोश मोर्चात एक ८० वर्षांच्या आजी रिकामी हंडा घेऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. मला एक गोष्ट मुख्यमंत्र्यांना विचारायची आहे. तुमच्या घराबाहेर ८० वर्षांच्या त्या झुकेगा नहीं आजी बसल्या होत्या. त्या आजींच्या घरी तुम्ही गेलात. आता पिण्याच्या पाण्यासाठी तरणाऱ्या या आजींच्या घरी तुम्ही जाणार का?", अशी टीका फडणवीसांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद