शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला मोठा धक्का, माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 15:07 IST

राजू शिंदे यांच्यासोबत १८ जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्ह्यातील मोठे नेते, माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदे यांनी हातात शिवबंधन बांधले. यावेळी राजू शिंदेंसोबत १८ जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला.

राजू शिंदे यांनी भाजपच्या विविध पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना थांबवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. गेल्या दोन दिवसांपासून भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात होता. शनिवारी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे यांनी राजू शिंदे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. मात्र, राजू शिंदे हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि अखेर आज त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदें यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदे यांच्यासोबत भाजपचे नगरसेवक गोकुळ मलके, प्रल्हाद निमगावकर, अक्रम पटेल, प्रकाश गायकवाड, रुपचंद वाघमारे यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे आता राजू शिंदे यांच्या राजकीय भूमिकेचा आगामी विधानसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

'या' पदाधिकाऱ्यांनी केला ठाकरे गटात प्रवेश- राजू शिंदे (माजी उपमहापौर भाजप) - गोकुळ मलके (नगरसेवक भाजप) - प्रल्हाद निमगावकर (नगरसेवक भाजप) - अक्रम पटेल (नगरसेवक राष्ट्रवादी) - प्रकाश गायकवाड ( नगरसेवक अपक्ष) - रुपचंद वाघमारे (नगरसेवक अपक्ष) - सय्यद कलीम (जिल्हा परिषद सदस्य शिंदे गट) - सतीश पाटील (पंचायत समिती सदस्य भाजप) - संभाजी चौधरी (ग्रामपंचायत सदस्य भाजप) - वसंत प्रधान (भाजप जिल्हा उपाध्यक्ष) - माया पाटील ( ग्रामपंचायत सदस्य) - शंकर म्हात्रे  - कैलास वाणी - प्रवीण कुलकर्णी - अभिजित पवार- मयूर चोरडिया - सौरभ शिंदे - आकाश पवार

सावे, शिरसाटांना बसणार धक्का?राजू शिंदे यांनी भाजपला रामराम केल्यामुळे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे आणि पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना धक्का बसला आहे. पूर्व मधील निवडणूक ही अटीतटीची होत असते. तसेच, पश्चिममध्ये आता शिरसाट यांना त्यांच्याच जुन्या पक्षाकडून तगडा प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येते. 

ठाकरे गटामधील इच्छुकांमध्ये नाराजीठाकरे गटामध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक चेतन कांबळे आणि लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सुद्धा इच्छुक आहेत. तसेच, माजी जि.प. सदस्य रमेश गायकवाड हे सुद्धा महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. यामुळे राजू शिंदे हे उद्धव ठाकरे येत असल्याने इच्छुकामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा