शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे यांचे उपोषण भाजपने केले ‘हायजॅक’, फडणवीस, दानवे होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 05:22 IST

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे औरंगाबादमध्ये २७ जानेवारी रोजी करणार असलेले मराठवाड्याच्या प्रश्नांसाठीचे उपोषण आता भाजपने पक्षाच्या नावाखाली ‘हायजॅक’ केले आहे.

- नजीर शेखऔरंगाबाद : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेऔरंगाबादमध्ये २७ जानेवारी रोजी करणार असलेले मराठवाड्याच्या प्रश्नांसाठीचे उपोषण आता भाजपने पक्षाच्या नावाखाली ‘हायजॅक’ केले आहे.औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होणाऱ्या एक दिवशीय उपोषणात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. १२ डिसेंबर रोजी परळीजवळील गोपीनाथ गडावरील भाषणात पंकजा यांनी औरंगाबादमधल्या उपोषणाची घोषणा केली होती. मराठवाड्याच्या पाणी व सिंचनाच्या प्रश्नांवर हे उपोषण असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्या सभेत त्यांचा रोख आणि राग हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता, असे मानले जाते. मात्र आता फडणवीस यांच्यासह इतर नेते उपोषणात सहभागी होणार आहेत. २०१३ मध्ये औरंगाबादेत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन राज्य सरकारविरुद्ध केलेल्या उपोषणाचा कित्ता पंकजा गिरवणार होत्या. मात्र पंकजा यांनी स्वतंत्र उपोषण केले असते तर पक्षातील दुहीचा संदेश मराठवाड्यात गेला असता आणि त्यामुळे भविष्यात पक्षाच्या अडचणीत वाढच झाली असती, असे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ैआहे.३ हजार कार्यकर्ते येणारपक्षाने पोलीस आणि विभागीय आयुक्त कार्यालयात परवानगी अर्ज सादर केले आहेत. या उपोषणात किमान अडीच ते तीन हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असे नियोजन करण्यात येत आहे. उपोषण आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे नसल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यात सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद