भाजप सरकारने चालविली शेतकºयांची चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:45 IST2017-09-16T23:45:37+5:302017-09-16T23:45:37+5:30

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया भाजपच्या काळात अजूनही शेतकरी, व्यापारी, कर्मचारी कोणीच सुखावला नाही. सगळ्यांचेच सारखे हाल आहेत. शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढली तर आमची खिल्ली उडविली. आता त्यात वारंवार नवे आदेश काढून शेतकºयांचीही चेष्टा केली जात आहे, असा आरोप आ.रामराव वडकुते यांनी केला.

The BJP government's efforts have taken a beating | भाजप सरकारने चालविली शेतकºयांची चेष्टा

भाजप सरकारने चालविली शेतकºयांची चेष्टा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया भाजपच्या काळात अजूनही शेतकरी, व्यापारी, कर्मचारी कोणीच सुखावला नाही. सगळ्यांचेच सारखे हाल आहेत. शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढली तर आमची खिल्ली उडविली. आता त्यात वारंवार नवे आदेश काढून शेतकºयांचीही चेष्टा केली जात आहे, असा आरोप आ.रामराव वडकुते यांनी केला.
वडकुते म्हणाले, आगामी काळात शेतकºयांच्या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभे केले जाणार आहे. शेतकºयांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. आत्महत्या थांबल्या नाहीत. कधी नव्हे, तो शेतकºयांनी संप केला. त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मागण्या तर मान्य केल्याच नाहीत, उलट त्यांच्यात फूट पाडण्याची खेळी केली. शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, पाठीशी आहे, असा शब्दप्रयोग करायचा अन् त्या दिशेने पावले उचलायची नाही, असेच सगळे चालले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा, शेतकरी समन्वय समितीच्या आंदोलनानंतर कर्जमाफी दिली. त्यात सतराशे अटी घातल्या. शिवाय रोज नवनवे आदेश काढत आहेत. दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना तर उर्वरित रक्कम मिळाल्याशिवाय लाभ नाही. एवढे करूनही कर्जमाफी देण्याची मानसिकताच नसल्याने चक्क शेतकºयांनाच बोगस ठरविण्याची मजल भाजपवाल्यांनी मारली आहे. पात्र, अपात्र न म्हणता असा शब्दप्रयोग म्हणजे सत्तेचा माज चढल्याचे दिसून येत आहे. कोणी शेतकºयांना साले म्हणतो, कोणी प्रेमप्रकरणातून आत्महत्या वाढल्या म्हणतो. असे अनेक विषय करून शेतकºयांची चेष्टाच केली जात आहे.
भरपावसाळ्यात ९ तासांचे भारनियमन होत आहे. शिवाय अव्वाच्या सव्वा देयके दिली जातात. शेतकºयांना डीपी, खांब आदी साहित्यासाठी पैसे मोजावे लागतात. वाहतूक खर्च अधिकारीच उचलून खातात. तीन-तीन महिने डीपी मिळत नाही. आॅईल खरेदी करायला यांच्याकडे पैसे नाहीत. वीजच नसेल तर शेतकरी समृद्ध कसा होईल? जलयुक्त तर नावालाच आहे. त्यात कुठेच पाणी साचले नाही. शिवाय एका गावातील १00 टक्के कामे करून दुसरे निवडायला पाहिजे होते. तसे न करताच दुसºयाची निवड केली जाते. मग्रारोहयोतील विहिरी तर दिवास्वप्न आहेत. राज्यभर नुसता गवगवा आहे. हिंगोलीतही दहा हजारांची घोषणा अन् दहाही झाल्या नाहीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीएसटीमुळे सामान्यांचाच खिसा कापला जात आहे. तर कर भरण्यासाठी व्यापाºयांनाही सुलभ प्रणाली दिली नाही. सर्वांनाच चोर समजण्याच्या भाजपच्या या वृत्तीमुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काळा पैसा, नोटबंदी फसली अन् काँग्रेसच्या काळातील जनहिताच्या काही योजना वगळता इतर कोणत्याच योजनांना निधी नाही. नव्या योजनाही नाहीत. स्वच्छ भारत, योग दिन, फूटबॉल सामने असे उत्सवी कार्यक्रम घेवून लोकांना गुरफटून ठेवण्याचे काम मात्र सुरू आहे. त्यामुळे सामान्यांचा या सरकारवरील विश्वास उडाला. यांना सत्तेची संधी देऊन तीन वर्षांचा काळ उलटला. तरीही काहीच दिसत नसल्याने आता उद्रेक होतोय. सामान्यांना खरोखर ‘अच्छे दिन’ यावेत, यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन उभारणार असल्याचेही वडकुते म्हणाले. यावेळी वडकुते यांच्यासमवेत जि.प.सदस्य मनीष आखरे, तालुकाध्यक्ष माधव कोरडे, नगरसेवक आमेर अली उपस्थित होते.

Web Title: The BJP government's efforts have taken a beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.