भाजपाचं सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य - संजय राऊत
By Admin | Updated: June 8, 2016 16:34 IST2016-06-08T15:06:29+5:302016-06-08T16:34:51+5:30
भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य असल्याची टीका मित्रपक्ष शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे

भाजपाचं सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य - संजय राऊत
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 08 - भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य असल्याची टीका मित्रपक्ष शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मोदी सरकारने 2 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त केलेल्या कार्यक्रमाचा निषेध करत शेतकरी मरत असताना कसलं सेलिब्रेशन करत आहात ? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला. संजय राऊत यांनी एकनाथ खडसेंवर टीका करताना एक मोठा बुडबुडा फुटला असं म्हटलं आहे. जो कोणी शिवसेनेच्या वाटेला गेला तो आडवा झाला किंवा तुरुंगात गेला असं संजय राऊत बोलले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यावर टीका करत गेल्या सहा महिन्यांपासून मराठवाड्यात बोलवत आहोत, मात्र त्यांना येण्यासाठी वेळ नाही असंही संजय राऊत बोलले आहेत.
संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर देताना शिवसेनेचं वागणं दुटप्पीपणाचं आहे. आपणदेखील लाल दिव्यात बसता हे जरा लक्षात ठेवा असं भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे.