सेवा सप्ताह अंतर्गत भाजपाच्यावतीने फ्रंटलाइन वर्करांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:05 IST2021-06-04T04:05:12+5:302021-06-04T04:05:12+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्यावतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त कोरोना का‌‌ळात ...

BJP felicitates frontline workers during service week | सेवा सप्ताह अंतर्गत भाजपाच्यावतीने फ्रंटलाइन वर्करांचा सत्कार

सेवा सप्ताह अंतर्गत भाजपाच्यावतीने फ्रंटलाइन वर्करांचा सत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्यावतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त कोरोना का‌‌ळात काम करणारे डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय सेवेतील रुग्णवाहिकाचालक आदी योद्धांचा सत्कार करण्यात आला. यावे‌ळी ॲड. अनिरुद्ध लोंढे, विष्णू बाबर, लसीकरण विभागप्रमुख तेजस्विनी सुरकर, पोलीस निरीक्षक किशोर पवार, पंडित किल्लारीकर, देवेश इनामदार, चालक अक्षय थोटे, फेरोज पठाण, सलीम शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुरज लोळगे, तालुकाध्यक्ष सुनील शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, संघटन सरचिटणीस लक्ष्मण औटे, शेखर पाटील, सरचिटणीस भाऊसाहेब बोरुडे, तालुका सरचिटणीस विजय चाटुपळे, सतीश आहेर, महेशबाबू जोशी, आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष समिर शुक्ल, श्याम पंजवाणी, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष प्रशांत आव्हाड, नम्रता पटेल आदींची उपस्थिती होती.

फोटो नाही...

Web Title: BJP felicitates frontline workers during service week