शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमच्या सय्यद मतीन यांना मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 16:45 IST

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावास विरोध केल्याने एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना सभागृहातच बेदम मारहाण करण्यात आली होती.

औरंगाबाद :  माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावास विरोध केल्याने एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना सभागृहातच बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी आज दुपारी मारहाण करणाऱ्या भाजपच्या ५ नगरसेवकांना पोलिसांनी अटक केली आहे. उपमहापौर विजय औताडे यांच्या तक्रारीवरून मतीन यांना शनिवारीच (दि. १८) अटक करण्यात आलेली आहे.

शुक्रवारी (दि.१७ ) एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी महानगरपालिकेच्या विशेष सभेत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावास विरोध करत वादग्रस्त व्यक्तव्य केले. यामुळे सभागृहात अभूपूर्व गोंधळ होत भाजप सदस्यांनी मतीन यांना बेदम मारहाण केली होती. या विरोधात मतीन यांनी मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावरून आज दुपारी मतीन यांना मारहाण करणारे भाजपचे उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक प्रमोद राठोड, राज वानखेडे,  माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे  यांना पोलिसांनी अटक केली. 

दरम्यान, या प्रकरणी शनिवारी (दि.१८ ) उपमहापौर विजय औताडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सय्यद मतीन यांना अटक करण्यात आली आहे. औताडे यांनी तक्रारीत नमूद केले की, १७ ऑगस्ट रोजी महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास महापौर नंदकुमार घोडेले  यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. त्यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ठराव मांडून  श्रद्धांजली वाहण्यात आली. सदस्यांची श्रद्धांजलीपर भाषणे चालू असताना एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन रशीद हा सभागृहामध्ये उभा राहिला आणि ओरडून दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलत होता. यावरून  सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर तो सभागृहाबाहेर गेला आणि तेथे उभ्या असलेल्या लोकांना चिथावणी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाArrestअटकAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन