शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पदाधिकाऱ्याचा वृक्षतोडीचा प्रताप ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 19:22 IST

हनुमान मंदिरासमोरील मोठी झाडे विनापरवाना तोडण्यात आले.

ठळक मुद्देच्चभू्र वसाहतीतच वृक्षतोड सुरू

औरंगाबाद : शिवसेना आणि भाजपत वृक्षतोडीवरून राजकीय घमासान सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने वृक्षतोडीवरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. दोन्ही पक्षांत वृक्षतोडीवरून वाक् युद्ध सुरू आहे. हा सगळा प्रकार वरिष्ठ पातळीवर होत असताना भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने मंदिरासमोरील वृक्षतोड करण्यास हातभार लावल्याची तक्रार प्रतापनगरातील नागरिकांनी केली आहे. आता या प्रकरणात भाजप काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. 

वृक्षारोपण, संवर्धनासाठी शासन मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे, तर दुसरीकडे उच्चभू्र वसाहतीतच वृक्षतोड सुरू आहे, विशेष म्हणजे पालिकेच्या पर्यावरण कक्षाला याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही. प्रतापनगर परिसरातील कासलीवाल विहारालगत असलेल्या हनुमान मंदिरासमोरील मोठी झाडे विनापरवाना तोडण्यात आले. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष श्याम थोरात यांच्या सांगण्यावरून ती झाडे तोडण्यात आल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मंदिराच्या कळसावर झाडांच्या काही फांद्या येत होत्या, तेवढ्याच तोडल्या. उर्वरित झाडे  कुणी तोडली याच्याशी माझा काहीही संबंध नाही. एक झाड तुटल्यानंतर मोठा आवाज झाल्यानंतर मी घरातून बाहेर आलो, त्यावेळी झाड पडल्याचे मला दिसून आले. या घटनेला दोन ते तीन दिवस उलटून गेले आहेत. झाडे  कुणाच्या सूचनेनुसार तोडली याबाबत वृक्षतोड करणाऱ्यांनी मला काही सांगितले नाही. त्यामुळे मी वृक्षतोड झाल्याबाबत कसे काय सांगणार, असा सवाल त्यांनी केला. 

मनपाचे उद्यान अधीक्षक म्हणाले,पालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, याप्रकरणी मनपाला काहीही माहिती देण्यात आलेली नाही. सदरील ठिकाणी भेट देऊन पंचनामा करून वृक्षतोड करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpollutionप्रदूषणBJPभाजपाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका