इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेला उदंड प्रतिसाद

By Admin | Updated: July 27, 2015 01:12 IST2015-07-27T00:35:59+5:302015-07-27T01:12:47+5:30

बीड : ‘लोकमत कॅम्पस क्लब’ आयोजित सुंदर इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेला रविवारी उदंड प्रतिसाद मिळाला. शहरातील ज्ञानेश्वर नगर भागातील तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत

A bitter response to the English signature tournament | इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेला उदंड प्रतिसाद

इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेला उदंड प्रतिसाद

 

बीड : ‘लोकमत कॅम्पस क्लब’ आयोजित सुंदर इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेला रविवारी उदंड प्रतिसाद मिळाला. शहरातील ज्ञानेश्वर नगर भागातील तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत विविध शाळांमधील ६१९ विद्यार्थी सहभागी झाले होते. चार गटांमध्ये पार पडलेल्या स्पर्धेचा लगेचच निकाल जाहीर करुन विजेत्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘लोकमत’ने कॅम्पस क्लब हा अभिनव उपक्रम आणला आहे. याअंतर्गत चालू शैक्षणिक वर्षामध्ये सदस्य झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या पहिल्याच कार्यक्रमाला विद्यार्थी, पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत स्पर्धा झाल्या. पहिली ते दुसरी, तिसरी ते पाचवी, सहावी ते सातवी, आठवी ते दहावी अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
परीक्षक म्हणून विकास साळूंके (औरंगाबाद), मीना नाईक (बीड) यांनी काम पाहिले. ‘तुलसी’चे संस्थाप्रमुख प्रा. प्रदीप रोडे, मुख्याध्यापक सुशीलकुमार जाधव, विजेंद्र सरकटे, व गायकवाड यांचे सहकार्य लाभले. गटनिहाय विजेते
पहिली ते दुसरी : स्तूती बनसोडे (सेंट अ‍ॅन्स स्कूल)-प्रथम, मंथन कुलकर्णी (श्री श्री रविशंकर स्कूल)- द्वितीय, जय जोगदंड (किडझी् स्कूल) - तृतीय
तिसरी ते पाचवी : निकूंज हरकूट (सेंट अ‍ॅन्स स्कूल)- प्रथम, रोहित टेपले (चंपावती इंग्लिश स्कूल) - द्वितीय, मुक्ता वेदपाठक ( नूतन इंग्लिश स्कूल)- तृतीय
सहावी ते सातवी : यशराज तावरे (गुरुकुल इंग्लिश स्कूल)- प्रथम, प्रांजल साबळे (तुलसी इंग्लिश स्कूल) - द्वितीय, प्रांजल इरंडे (संस्कार विद्यालय)- तृतीय
आठवी ते दहावी : क्रांती राऊत (ग्रामीण मा. विद्यालय नेकनूर)- प्रथम, अरविंद क्षीरसागर (गुरुकुल इंग्लिश स्कूल) - द्वितीय, खतीब झिशान अफझालूद्दीन (मिलीया मुलांचे इंग्लिश स्कूल) - तृतीय
(प्रतिनिधी)

Web Title: A bitter response to the English signature tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.