दहा हजार रुपयांची लाच घेताना बीट अंमलदार चतुर्भुज

By Admin | Updated: July 8, 2017 00:27 IST2017-07-08T00:26:46+5:302017-07-08T00:27:55+5:30

माजलगाव :लाच घेताना माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार पंडित खोडवे याला शुक्रवारी सायंकाळी प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.

Bit Assurant Quadrilateral with a bribe of Rs.10,000 | दहा हजार रुपयांची लाच घेताना बीट अंमलदार चतुर्भुज

दहा हजार रुपयांची लाच घेताना बीट अंमलदार चतुर्भुज

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या वाळूचे ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार पंडित खोडवे याला शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता एका हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.
तालुक्यातील नागडगाव येथील तक्रारदाराचे वाळूचे ट्रॅक्टर २७ जून रोजी महसूल विभागाने पकडून ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सदरील ट्रॅक्टर सोडण्यास सहकार्य करणे, तक्रारदाराच्या भावास जामिनास मदत करणे यासाठी बीट अंमलदार पंडित कारभारी खोडवे याने २० हजार रूपयांची लाच मागितली होती. मागणीतील दहा हजार रूपये घेताना खोडवे याला शिवाजी चौकातील राधिका पार्लर हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले.

Web Title: Bit Assurant Quadrilateral with a bribe of Rs.10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.