गुड न्यूज चर्चचे संस्थापक बिशप वाय़ एम़दुप्ते यांचे निधन
By Admin | Updated: December 25, 2016 23:46 IST2016-12-25T23:44:35+5:302016-12-25T23:46:48+5:30
लातूर : गुड न्यूज चर्चचे संस्थापक बिशप वाय़एम़ दुप्ते यांचे रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराने निधन झाले़

गुड न्यूज चर्चचे संस्थापक बिशप वाय़ एम़दुप्ते यांचे निधन
लातूर : गुड न्यूज चर्चचे संस्थापक बिशप वाय़एम़ दुप्ते यांचे रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराने निधन झाले़ मृत्यू समयी त्यांचे वय ७१ वर्षांचे होते़ महाराष्ट्रातील ३५ गुड न्यूज चर्चची स्थापना बिशेप वाय़एम़ दुप्ते यांनी केली असून गेल्या ४० वर्षांपासून ते धर्मकार्यात होते़ अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली़ नाताळाच्या सणादिवशी त्यांचे निधन झाल्याने लातूर जिल्ह्यातील नाताळचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले़
बिशेप वाय़एम़ दुप्ते गेल्या काही दिवसांपासून त्यांना हृदयाचा त्रास होता़ त्यांच्यावर लातुरातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते़ दरवर्षी लातूर शहर व जिल्ह्यात ख्रिसमस जन्मोत्सवाचा उत्साह असतो़ यंदा ते आजारी असल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले नव्हते़
रविवारी शहरातील सर्व चर्चमध्ये केवळ प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते़ मात्र रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बिशेप वाय़एम़ दुप्ते यांचे निधन झाल्याची वार्ता पसरताच सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले़ मळवटी रोड येथील गुड न्यूज चर्च येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे़
बिशेप वाय़एम़ दुप्ते यांच्या पार्थिवावर आर्वी येथील ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीत सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली असा परिवार आहे़ नगरसेवक डॉ़ प्रभुदास गुप्ते यांचे बंधू, रेव्ह बेंजामीन दुप्ते यांचे ते वडिल होत़