सोयगाव तालुक्यात मुलींचा जन्मदर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:06 IST2021-03-09T04:06:41+5:302021-03-09T04:06:41+5:30

सोयगाव तालुक्यात जानेवारीनंतर जन्माला आलेल्या मुलींची संख्या ७५ इतकी असून, मुलांची संख्या ६४ आहे. वर्षभरात तालुक्यातील मुलींच्या जन्मदरात ११.७१ ...

Birth rate of girls increased in Soygaon taluka | सोयगाव तालुक्यात मुलींचा जन्मदर वाढला

सोयगाव तालुक्यात मुलींचा जन्मदर वाढला

सोयगाव तालुक्यात जानेवारीनंतर जन्माला आलेल्या मुलींची संख्या ७५ इतकी असून, मुलांची संख्या ६४ आहे. वर्षभरात तालुक्यातील मुलींच्या जन्मदरात ११.७१ टक्के वाढ झाली असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला आहे. यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प आणि आरोग्य विभागाने घेतलेली गरोदर मातांची काळजी, यामुळेच मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत संजीवन सोनवणे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावाला सभापती साहेबराव गायकवाड यांनी अनुमोदन दिल्यावर सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला. यावेळी प्रतिभा जाधव, रस्तुलबी पठाण, लता राठोड, धरमसिंग चव्हाण आदींची उपस्थिती होती.

चौकट

जिल्ह्यात सोयगाव तालुका अव्वल

मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याने जिल्ह्यात सोयगाव तालुका अव्वल ठरला आहे. तालुक्यात झीरो ते सहा वर्षे वयोगटातील मुलींची संख्या ५७८६ इतकी असून, मुलांची संख्या ५७७८ आहे. यामुळे मुलींची संख्या ही मुलांपेक्षा अधिक आहे.

Web Title: Birth rate of girls increased in Soygaon taluka