शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हेल्थ केअरचा कोट्यावधींचा घोटाळा; प्रतिमहिना ३५० रुपयेप्रमाणे जमाकरून शेकडो नागरिकांना फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 19:44 IST

health care scams in Aurangabad : ज्यांनी तक्रार केलेली नाही, त्यांनी पुढे यावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे

ठळक मुद्देआरोपी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात औरंगाबाद शहरात ३० लाख रुपये उकळले

औरंगाबाद : प्रतिमहिना ३५० रुपयेप्रमाणे २० महिने ७ हजार रुपये गोळा करून शहरातील शेकडो नागरिकांना ३० लाख १३ हजार ८५ रुपयांची फसवूणक केल्याच्या प्रकरणात फेनॉलिनल हेल्थ केअर कंपनीचा प्रमुख नंदलाल केसरसिंग यास आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. हेल्थ केअरचा हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याची माहिती निरीक्षक दादाराव सिनगारे यांनी दिली. तसेच ज्यांनी तक्रार केलेली नाही, त्यांनी पुढे यावे, असे आवाहनही सिनगारे यांनी केले आहे. ( Billions in health care scams; Hundreds of citizens were cheated out of Rs 350 per month) 

अतुल बाळासाहेब जाधव (३५, रा. गट नं.५२/१, सारा व्यंकटेश बिल्डिंग सी १, विंग १, प्लॉट नंबर ९, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर) यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यात फेनॉलिनल हेल्थ केअर सर्व्हिसेस कंपनी लिमिटेडचे चेअरमन नंदलाल केसरसिंग, संचालक थक्केमधाथील श्रीधरन नायर, सेबेस्टिन मल्लीकल, मीनबहादूर केसरसिंग, कार्यकारी संचालक विलास बाळकृष्ण नायर आणि जोसेफ लाझर (सर्व रा. मुंबई) यांचा समावेश होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नंदलाल यास लातुर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेने त्याचा ताबा २१ सप्टेंबर रोजी लातुर कारागृहातून घेतला. ही कामगिरी निरीक्षक दादाराव सिनगारे, तपासी अधिकारी सहायक निरीक्षक तृप्ती तोटावार, सहायक फाैजदार गोकुळ वाघ, नाईक विठ्ठल मानकापे, संजय जारवाल, संदीप जाधव, अनिल थोरे, बाबा भानुसे यांच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपीला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह 

काय आहे प्रकरण ?फेनॉलिनल हेल्थ केअर कंपनीने दरमहा ३५० रुपयेप्रमाणे २० महिने ७ हजार रुपये जमा करून घेतले. या बदल्यात कंपनी नऊ वर्षांनी दुप्पट १४ हजार रुपये देणार होती. तसेच ९ वर्षांच्या कालावधीत दवाखान्याचा खर्च हा या पॉलिसीतंर्गत विनामूल्य होणार असल्याचे कंपनीच्या ज्योतीनगर येथील कार्यालयातील व्यवस्थापक विकास पाटील यांनी सांगितले. यानुसार अतुल जाधव यांनी १ जानेवारी २००५ ते २८ मे २०१८ या कालावधीत पैसे भरले. त्यानंतर ३० आॅक्टोबर २०१५ रोजी पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे मूळ पॉलिसी व पैसे भरणा पावत्या जमा करून कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातून जाधव यांच्या नावे १४ हजार रुपयांचा धनादेश आला. मात्र तो धनादेश वटलाच नाही. तेव्हा कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली असता बंद दिसले. याच प्रकारे शहरातील शेकडो जणांना कंपनीने ३० लाख १२ हजार ८५ रुपयांना फसविण्यात आले आहे.

हेही वाचा - बिबी-का-मकबरा परिसरात दडले काय ? उत्खननात स्नानगृह, शौचालयाचा पाया उघडा

हेही वाचा - पत्नी गेली माहेरी, नांदायला परत यावी म्हणून फोटो व्हायरल करून केली बदनामी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस