सुंदर हस्ताक्षर स्पर्धेस उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:57 IST2018-03-05T00:56:14+5:302018-03-05T00:57:45+5:30
लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब व श्री साई हॅण्डरायटिंग इंप्रूव्हमेंट इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.४) आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ९०० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सुंदर हस्ताक्षर स्पर्धेस उदंड प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब व श्री साई हॅण्डरायटिंग इंप्रूव्हमेंट इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.४) आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ९०० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
लोकमत भवन, लोकमत हॉल येथे इंग्रजी हस्ताक्षरासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. अनेक दिवसांपासून विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते. अखेर स्पर्धेचा दिवस आला आणि विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षराचे क ौशल्य दाखवून दिले. इयत्ता पहिली ते पाचवी गटासाठी सकाळच्या सत्रात, तर इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दुपारच्या सत्रात ही स्पर्धा घेण्यात आली.
यानंतर सायंकाळी ५ वाजता विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरांचे परीक्षण करून सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल
इयत्ता पहिली - प्रथम- आर्या जाधव, द्वितीय - अर्णव जक्कल, तृतीय- यश लोहार, चतुर्थ- तन्मयी डोडे, पाचवा- वरद शित्रे.
इयत्ता दुसरी - प्रथम- अथर्व वरकड, द्वितीय- राजवीर धनावत, तृतीय- रुद्राणी साळुंखे, चतुर्थ- हिमांशू गायकवाड , पाचवी- रुतुजा रांजवण.
इयत्ता तिसरी - प्रथम- शिवानी पठाडे, द्वितीय- श्रावणी ढवळे, तृतीय- अक्षरा थोरात, चतुर्थ- हर्ष पवार, पाचवी- स्वरा देवरे.
इयत्ता चौथी - प्रथम- श्रुती पंडित, द्वितीय- तनिष्का गव्हाणे, तृतीय- किर्तिका बाबू, चतुर्थ- दिव्या वाळेकर, पाचवी- खुशी जैस्वाल.
इयत्ता पाचवी - प्रथम- तेजस्विनी सूर्यवंशी, द्वितीय- पलक साळुंखे, तृतीय- वैष्णवी जाधव, चतुर्थ- रुतुजा वाहातुले, पाचवी- कल्याणी म्हस्के व नक्षत्रा साळुंखे.
इयत्ता सहावी - प्रथम- संस्कृती घोडेराव, द्वितीय- अदिती विडेकर, तृतीय- सिद्धी दोडिया, चतुर्थ- शेख महंमद फरहान महंमद अली, पाचवी- अर्पिता चौधरी.
इयत्ता सातवी - प्रथम- सरगम गांधी , द्वितीय- समीक्षा गोरे, तृतीय- सुयश पहारे, चतुर्थ- निकिता झिर्जुंर्डे, पाचवी- मधुरा जावळे.
इयत्ता आठवी - प्रथम- गोपाल गायकवाड, द्वितीय- मयुरी जोशी, तृतीय- प्रणव पाचलुरे, चतुर्थ- व्यंकटेश नेरकर, पाचवी- अंजली ठोंबरे.
इयत्ता नववी - प्रथम- तितिक्षा जाधव, द्वितीय- नूपुर लाडवाणी, तृतीय- प्रथम गायकवाड, चतुर्थ- अक्षय चौधरी, पाचवा- शेख आवेज शेख अनिस.
कॅलिग्राफी लिपीमध्ये पाच बक्षिसे - श्रीपाद हिरे, तेजल रंगदळ, यश सुरपुरिया, तनय हम्बिरे, खुशी राजपूत.