भिलदरीत बिबट्याने पाडला बैैलाचा फडशा
By Admin | Updated: October 12, 2016 01:15 IST2016-10-12T00:49:20+5:302016-10-12T01:15:11+5:30
पिशोर : येथून जवळच असलेल्या भिलदरी (पिशोर) येथे सोमवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाला, तर मंगळवारी सकाळी सर्पदंश झाल्याने

भिलदरीत बिबट्याने पाडला बैैलाचा फडशा
पिशोर : येथून जवळच असलेल्या भिलदरी (पिशोर) येथे सोमवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाला, तर मंगळवारी सकाळी सर्पदंश झाल्याने एक गाय व एका म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
भिलदरी शिवारात सुनाळवाडीजवळ मोहन बागू सुलाने यांची माळावर शेती असून तेथे सोमवारी सायंकाळी बैल बांधून ते घरी परत आले. सकाळी शेतात गेले असता त्यांना बिबट्याने बैलाचा फडशा पाडल्याने आढळून आले.
तर मानसिंग छोटीराम गोटवाल यांच्या गायीचा व मर्दन कायटे यांच्या म्हशीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. तिन्ही घटनांचे महसूल विभाग व वनविभागाने पंचनामे केले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपा तालुका सरचिटणीस विजय वैष्णव, पोलिस पाटील दिलीप महेर, सुखसागर सिंगल, चंपालाल कायटे, भागचंद गोठवाल, कपूर गोठवाल, अकबर शहा, एकनाथ चौथमल, कचरू बेडवाल आदींनी केली आहे.