बीड बायपासवर दुचाकीस्वाराचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:33 IST2017-11-21T00:32:55+5:302017-11-21T00:33:00+5:30
बीड बायपासवरील बाळापूरजवळील गुरुप्रसादनगर येथे दुचाकी व मालवाहतूक करणाºया वाहनाची धडक लागून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

बीड बायपासवर दुचाकीस्वाराचा अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बीड बायपासवरील बाळापूरजवळील गुरुप्रसादनगर येथे दुचाकी व मालवाहतूक करणाºया वाहनाची धडक लागून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
जनार्दन शिरसाट (५५, रा. वाकोळणी बाहेगाव, ता. बदनापूर) असे जखमीचे नाव असून, (एमएच २०, सीझेड ८३१६) या मोटारसायकलीने बायपासवरून जात असताना (एमएच २०, डीई ५३५०) या छोट्या टेम्पोची जोराची धडक दुचाकीला लागली. अपघातग्रस्त व्यक्ती रोडवर पडून दुचाकीसह दोनशे फूट दुभाजक ओलांडून रोडपलीकडे पडला होता. शिरसाट याच्या डाव्या पायाचे पंजाजवळ दोन तुकडेच झाल्याचे दिसत होते, तर हाताला तसेच कपाळावरही जखम झाल्याचे दिसत होते.
ग्रीव्हज कॉटन येथील इंजिनिअर सचिन कटारे व इंद्रजित खोबरे, चालक बाळू अपघात झाला त्यावेळी याच रस्त्यावरून एका कर्मचाºयाला प्रकृती खराब झाल्याने घरी सोडण्यासाठी जात होते. त्यांनी माणुसकी दाखवून जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले.
रस्त्याच्या दुभाजकावर डोके आदळले, तरी दुचाकीचालकाच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने फारशी इजा झाली नाही; परंतु हातायापाला जबर मार लागला.