शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

रूळ ओलांडताना दुचाकी अडकली, तेवढ्यात धडाडत आली रेल्वे, दुचाकी सोडून तरुणाने काढला पळ, रेल्वेखाली दुचाकीचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 11:36 PM

फाटक नसलेल्या ठिकाणावरून धूमस्टाईल रेल्वेरूळ ओलांडताना दुचाकी रूळात अडकली व तेवढ्यात समोरून धडाडत रेल्वे आली. गतीने येणारी रेल्वे पाहून तरुणाने दुचाकी तशीच सोडून पळ काढल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. संग्रामनगर परिसरातील रेल्वेरूळावर सोमवारी (दि. ६) सकाळी हा प्रकार घडला. रेल्वेच्या धडकेत दुचाकीचा चुराडा होऊन तुकडे तुकडे झाले.

ठळक मुद्देसंग्रामनगर रेल्वेरूळावरील घटना: मोठा अनर्थ टळला

औरंगाबाद : फाटक नसलेल्या ठिकाणावरून धूमस्टाईल रेल्वेरूळ ओलांडताना दुचाकी रूळात अडकली व तेवढ्यात समोरून धडाडत रेल्वे आली. गतीने येणारी रेल्वे पाहून तरुणाने दुचाकी तशीच सोडून पळ काढल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. संग्रामनगर परिसरातील रेल्वेरूळावर सोमवारी (दि. ६) सकाळी हा प्रकार घडला. रेल्वेच्या धडकेत दुचाकीचा चुराडा होऊन तुकडे तुकडे झाले. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिसांनी घेतली.प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी सांगितले की, संग्रामनगर रेल्वे फाटक बंद केल्यानंतरही परिसरातील रहिवासी नागरिक धोकादायक पद्धतीने रेल्वेरूळ ओलांडतात. काही महाशय तर चक्क रेल्वेरूळावरून दुचाकी नेतात. अशाच प्रकारे सोमवारी सकाळी एक तरुण बायपासकडून संग्रामनगरकडे दुचाकीने येऊ लागला. उड्डाण पुलावरून जाण्याऐवजी खालच्या बाजूने तो रेल्वेरूळ ओलांडू लागला. तेव्हा त्याची मोपेड रूळामध्ये अडकली. त्याचवेळी मराठवाडा एक्स्प्रेस हॉर्न वाजवीत निघाली होती. प्रयत्न करूनही त्या तरुणाला मोपेड रूळावरून बाजूला घेता येईना. रेल्वे जवळ आल्याचे पाहून त्याने प्रसंगावधान राखत दुचाकी रूळावर सोडून पळ काढला. यामुळे त्याचे प्राण वाचले. मात्र, भरधाव रेल्वेच्या धडकेने त्याची मोपेड सुमारे ५० ते ६० मीटर फरपटत नेली. या घटनेत त्याच्या मोपेडचे स्पेअर पार्ट वेगवेगळे होऊन रूळावर विखुरले. रेल्वेचालकाने इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबविली. सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांना ही माहिती कळविली. जमादार आवारे, कुंदन शेळके आणि लोहमार्ग पोलिसांचे उपनिरीक्षक कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून रूळावरील दुचाकीचे विखुरलेले स्पेअर पार्ट जप्त केले. मोपेडस्वार तरुणाचा पोलीस शोध घेत आहे.मोठा अनर्थ टळलारेल्वेचे चाक आणि रूळाच्या घर्षणातून ठिणग्या पडत असतात. दुचाकीमधील पेट्रोल जर ठिणग्यांच्या संपर्कात आले असते, तर रेल्वेने पेट घेतला असता आणि मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने दुचाकीची इंधन टाकी फुटून पेट्रोल सांडले नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेAccidentअपघात