दुचाकी पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:38+5:302021-02-05T04:19:38+5:30
================= किरकोळ कारणावरून मारहाण औरंगाबाद : निकम्मा म्हटल्याच्या कारणावरुन संजय अभिमन्यू वाघोळे (रा. राहुल नगर) यांना जावेद बेग ...

दुचाकी पळवली
=================
किरकोळ कारणावरून मारहाण
औरंगाबाद : निकम्मा म्हटल्याच्या कारणावरुन संजय अभिमन्यू वाघोळे (रा. राहुल नगर) यांना जावेद बेग बाबा बेग आणि त्याच्या एका साथीदाराने लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केले. दिनांक १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अयोध्या नगरी मैदानाजवळ ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक सचिन वायाळ या घटनेचा तपास करत आहेत.
===================
नकली बिडी विकणाऱ्याविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : नकली बिडीची विक्री करणाऱ्या दुकानदार सय्यद जफर सय्यद मोहम्मद याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे अधिकारी अनुप संभाजी कोलप यांनी बारापुल्ला गेटजवळील किराणा दुकानातून २६ हजार ५०० रुपये किमतीची संभाजी बिडी जप्त केली.
======================
विवाहितेचा छळ
औरंगाबाद : ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करण्यासाठी माहेरहून २५ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप चौधरी, सीसराम चौधरी, अमरदीप झांझडिया आणि दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
================(
नाथ नगरातून दुचाकी पळवली
औरंगाबाद : नाथ नगर येथे घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी (एमएच २० एडी ७३७२) चोरट्यांनी लंपास केली. दिनांक ३० डिसेंबर रोजी रात्री झालेल्या या चोरीविषयी हरिभाऊ भाऊराव खिल्लारे यांनी जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
==========(===========
दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ
औरंगाबाद : ऑईल मिल टाकण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करून विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिनांक १९ ऑगस्ट २०१८ ते १४ ऑक्टोबर २०२० दरम्यान आपला छळ झाल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. रवींद्र सोमीनाथ राठोड, सोमीनाथ राठोड, अमोल सोमीनाथ राठोड, नितेश चव्हाण आणि दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे.