दुभाजकावर दुचाकी आदळली; शिक्षक ठार

By Admin | Updated: April 30, 2017 23:59 IST2017-04-30T23:56:56+5:302017-04-30T23:59:38+5:30

मुरूम : रस्ता दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

Bike hit a bikini; Teacher killed | दुभाजकावर दुचाकी आदळली; शिक्षक ठार

दुभाजकावर दुचाकी आदळली; शिक्षक ठार

मुरूम : रस्ता दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उमरगा तालुक्यातील मुरूम येथे शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
लोहारा शहरातील नागनाथ निर्मळे (वय ५६) हे मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात संस्कृत विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते दुचाकीवरून जात असताना मुरूम शहरातील आरोग्य कर्मचारी वसाहतीसमोरील मुख्य रस्त्याच्या दुभाजकाला त्यांची दुचाकी धडकली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेवून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रविवारी दुपारी लोहारा शहरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पुतणीचे ४ एप्रिल रोजी लग्न होते. (वार्ताहर)

Web Title: Bike hit a bikini; Teacher killed