दुचाकीचोराचा पर्दाफाश;१० वाहने जप्त
By Admin | Updated: February 7, 2017 23:02 IST2017-02-07T22:57:40+5:302017-02-07T23:02:10+5:30
बीड : महिन्यापूर्वी पकडलेल्या दुचाकीचोरांच्या टोळीतील तिसरा आरोपी मंगळवारी दरोडा प्रतिबंधक पथकाच्या गळाला लागला आहे.

दुचाकीचोराचा पर्दाफाश;१० वाहने जप्त
बीड : महिन्यापूर्वी पकडलेल्या दुचाकीचोरांच्या टोळीतील तिसरा आरोपी मंगळवारी दरोडा प्रतिबंधक पथकाच्या गळाला लागला आहे. त्याच्याकडून दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या टोळीतील एकूण आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.
संभाजी राऊत व किशोर राऊत (दोघे रा. बडगव्हाण ता. शेवगाव जि. अहमदनगर) अशी यापूर्वी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २० दुचाकी जप्त केल्या होत्या. याच टोळीसाठी काम करणारा दिनेश सूर्यभान उपाध्ये (रा. वाघाळा ता. परळी) हा पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. सोमवारी रात्री त्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. त्याने दहा गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून चार लाख किंमतीच्या चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची कसून चौकशी सुरु असून आणखी काही गुन्हे उघडकीस येतील, असे दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक श्रीकांत उबाळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्याने बीड, परळी, गेवराईत गुन्हे केले. त्याला तपासकामी गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केले असल्याचे ते म्हणाले.
पोहेकॉ संजय खताळ, बबन राठोड, संजय सेलमोहकर, बालासाहेब सुरवसे, गणेश दुधाळ, मारोती सानप, प्रकाश वक्ते, दिलीप गलधर, श्रीमंत उबाळे, आर. के. नागरगोजे, सुबराव जोगदंड, अशोक दुबाले, नारायण साबळे, सौंदरमल यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)