शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

मोठी बातमी! कॉपी-पेस्ट प्रबंधावरून संशोधकास दणका, कुलपतींनी केली पीएचडी पदवी रद्द

By राम शिनगारे | Updated: October 26, 2023 12:53 IST

विद्यापीठाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएच.डी. पदवी रद्द होण्याची घटना घडली आहे.

छत्रपती संभाजीनगर : पीएच.डी. च्या संशोधन प्रबंधात वाड्ःमय चौर्य केल्याप्रकरणी किशोर धाबे यांची पीएच.डी. पदवी रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी मान्यता दिली आहे. विद्यापीठाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएच.डी. पदवी रद्द होण्याची घटना घडली आहे.

विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयात किशोर निवृत्ती धाबे यांनी ’ किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्व आणि आदिवासींसाठीच्या कल्याणकारी ध्येय-धोरणांची अंमलबजावणी ’ या विषयात संशोधन केले. या संशोधनाचा शोधप्रबंध २०१३ मध्ये सादर केला. त्यानुसार त्यांना विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी मिळाली. या शोध प्रबंधात वाड्ःमय चौर्य केल्याची तक्रार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पुरुषोत्तम रामटेके यांनी पुराव्यासह दाखल केली होती. डॉ. मारोती तेगमपुरे व देशमुख यांच्या शोध प्रबंधातील मजकूर चोरल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार कुलगुरू डॉ. येवले यांनी डॉ. धर्मराज वीर, डॉ. शूजा शाकेर व डॉ. मृदुल निळे या तीन सदस्यांची विभागांतर्गत चौकशी समिती नेमली.

या समितीने सदर शोध प्रबंधात ५१ टक्के वाड्ःमय चौर्य झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विद्यापीठस्तरीय सत्यशोधन समितीनेही चौकशी केली. त्यात ६५ टक्के वाड्ःमय चौर्य केल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेच्या बैठकीत सर्वानुमते हा अहवाल स्वीकारून पीएच.डी. रद्द करण्यास संमती दिली. त्यानंतर पदवी रद्द करण्याची शिफारस कुलपती रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली. कुलपतींनी मागील महिन्यात त्यावर सुनावणी घेतली. त्यात विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य करून पीएच.डी. रद्द करण्यास मंजुरी दिली. त्याविषयीची माहिती ‘राजभवन’ चे अप्पर सचिव विकास कुलकर्णी यांनी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना पत्राद्वारे दिली.

गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्नशीलचार वर्षांच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांची कठोर अंमलबजावणी केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे संशोधनाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

संशोधकांनी गांभीर्याने नोंद घ्यावीसंशोधनातील वाड्ःमय चौर्य करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून संशोधकांनी यांची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. अशा घटनांमुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. संशोधकांनी अत्यंत गांभीर्याने संशोधन कार्य करावे, तसेच नेमकी तथ्य व निष्कर्ष मांडावेत.- डॉ. श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादRamesh Baisरमेश बैसEducation Sectorशिक्षण क्षेत्र