शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! वाळू तस्करास एक वर्षाची कैद; पैठण न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 13:21 IST

पैठण न्यायालयाच्या निकालामुळे वाळू तस्करात मोठी खळबळ माजली असून सर्वसामान्य जनतेतून स्वागत करण्यात येत आहे.

पैठण (छत्रपती संभाजीनगर) : वाळू चोरी प्रकरणात तस्करास एक वर्षाचा तुरूंगवास व पाच हजार रू दंडांची शिक्षा पैठण न्यायालयाने सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बेफाम झाळेल्या वाळू तस्करांना निश्चितच चाप बसणार असून वाळू चोरीत शिक्षा होते याची जाणीव झाल्याने वाळू चोरांची हिंमत खचणार असल्याची चर्चा आहे.

वाळू चोरीच्या बाबतीत तुरूंवासाची शिक्षा देणारा निकाल या अगोदर देण्यात आलेला नसल्याने पैठण न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करण्यात येत आहे. केवळ आर्थिक दंड होत असल्यामुळे  माफियांची हिंमत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे. सध्यातर प्रशासकीय अधिकारी, पत्रकार यांच्यावर हल्ला करण्याईतपत वाळू माफियांची हिंमत वाढली आहे. दरम्यान, बाळासाहेब उत्तमराव मनोहर (५५, रा हर्सुली ता गंगापुर  जि छत्रपती संभाजी नगर) या वाळू तस्करास पैठण न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. भावसार यांनी एक वर्षाच्या तुरंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 

काय होते प्रकरण ?बिडकीन पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भातनाते यांनी पेट्रोलिंग दरम्यान सन २०१४ मध्ये बाळासाहेब मनोहर याचा वाळूने भरलेला ट्रक  ( एम एच १५- सीके २४४२) चितेगाव परिसरात पकडला होता. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन बाळासाहेब मनोहर याने ट्रक सोडून पळ काढला. या प्रकरणात तत्कालीन हवालदार प्रकाश शिंदे यांनी गुणवत्तापूर्ण तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केले. सरकारी अभियोक्ता अनिल शिंपी यांनी या प्रकरणातील ४ साक्षिदारांच्या साक्ष नोंदवून आरोपी बाळासाहेब मनोहर याने वाळूचोरीचा गुन्हा केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी  न्यायालयास या प्रकरणी प्रशासकीय मदत केली. साक्षीदारांची साक्ष व पुरावे लक्षात घेऊन पैठण न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. भावसार यांनी आरोपी बाळासाहेब मनोहर यास शिक्षा सुनावली. पैठण न्यायालयाच्या निकालामुळे वाळू तस्करात मोठी खळबळ माजली असून सर्वसामान्य जनतेतून स्वागत करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादsandवाळूCourtन्यायालय