शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: मोबाइलवर फोटो काढून चालान दिल्यास आता 'खाकी'वरच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:53 IST

राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांचा आदेश : तीन वेळा परिपत्रक, तरीही वाहतूक पोलिसांकडून नियमभंग

- सुमित डोळे

छत्रपती संभाजीनगर : नियम मोडणाऱ्या वाहनाचे खाजगी मोबाइलद्वारे छायाचित्र काढून चालान फाडल्यास आता वाहतूक पोलिसांवरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी नुकतेच याबाबतचे परिपत्रक जारी केले.

२०१५-१६ मध्ये राज्यात पहिल्यांदा ऑनलाइन चालान प्रणालीला सुरुवात झाली. मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर २०१९ मध्ये राज्यभरात ई-चालान यंत्राद्वारे ऑनलाइन दंड, चालान सुरू करण्यात आले. वाहतूक पोलिसांवर सातत्याने होणाऱ्या लाचखोरीच्या आरोपांपासून वाचण्यासाठी या प्रणालीला महत्त्व प्राप्त झाले. या चालान प्रक्रियेसाठी शासनाने दिलेल्या ई-चालान मशीनद्वारेच छायाचित्र काढणे अपेक्षित होते. मात्र, अनेक वाहतूक अधिकारी, अंमलदार स्वतःच्या मोबाइलमध्ये नियम मोडणाऱ्या वाहनचालकाचे छायाचित्र काढून सोयीनुसार ई-चालान मशीनमध्ये अपलोड करून दंड ठरवतात. विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी परिवहनमंत्र्यांसोबतच्या मुंबईतील बैठकीत यावर तीव्र आक्षेप नोंदवला.

काय म्हटले आहे परिपत्रकात?या बैठकीनंतर राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी राज्यभरातील वाहतूक पोलिसांसाठी परिपत्रक जारी केले. त्यातील आदेशानुसार :-वाहतुकीचे नियमन करताना अधिकारी, अंमलदार खाजगी मोबाइलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने छायाचित्रे काढून सोयीनुसार चालान पाठवितात.-अशा प्रकारे मोबाइलद्वारे छायाचित्र काढून ई-चालान केल्यास पोलिस अधिकारी, अंमलदारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.-वाहतूक पोलिसांनी यासाठी केवळ ई-चालानचाच वापर करावा, अशी कडक सूचना या परिपत्रकानंतर वाहतूक पोलिसांना करण्यात आली आहे.

मेगापिक्सेलची अडचणयापूर्वी मोबाइलद्वारे छायाचित्र काढून दंड आकारण्यावर आक्षेप नोंदवले गेले होते. खंडपीठातदेखील याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. अपर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून दोन वेळा अशाच प्रकारे परिपत्रक जारी झाले. मात्र, वाहतूक पोलिसांकडून मोबाइलद्वारेच छायाचित्र काढून ई-चालान मशीनवर अपलोड करून नंतर दंड आकारण्यात येतो. ई-चालान मशीनचे मेगापिक्सेलच कमी असल्याने त्याद्वारे चालत्या, वेगात असलेल्या वाहनाचे छायाचित्र काढणे कठीण असल्याचे मत वाहतूक पोलिसांनी नोंदवले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtraffic policeवाहतूक पोलीस