शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! औरंगाबाद महापालिकेची निवडणूक थेट पुढील वर्षीच जाणार, दुसऱ्या टप्प्यात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 16:13 IST

१४ महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात, औरंगाबादचा दुसऱ्या टप्प्यात समावेश 

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात केली. राज्यातील १४ महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार असून, औरंगाबादसह इतर महापालिकांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होईल, हे निश्चित. राज्यातील १४ महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यास सुरुवातही केली.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका घेण्याचे आदेश ४ मे रोजी निवडणूक आयोगाला दिले. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच निवडणूक आयोगाने ११ मार्च २०२२ पर्यंत निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली कारवाई पुढे सुरू केली. १० मे राेजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांसाठी एक आदेश काढला. या आदेशात संबंधित महापालिकांची अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. प्रभाग रचना राजपत्रात अंतिम केल्यानंतर लगेच निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो.

पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळा संपताच त्या होतील, अशी अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय पहिल्यांदाच राज्यातील महापालिका निवडणुका होतील, असे आतापर्यंतचे तरी चित्र आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यासाठी शासनाने निवडणुका घेण्यासंबंधीचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले होते. मात्र ते कायद्याच्या चौकटीत बसले नाही.

१४ महापालिका कोणत्या?नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, बृहन्मुंबई व ठाणे.

दुसऱ्या टप्प्यातील महापालिकाभिवंडी-निझामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, मालेगाव, परभणी, औरंगाबाद, नांदेड, नांदेड- वाघाळा, लातूर, चंद्रपूर.

औरंगाबादची स्थितीराज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद महापालिका प्रशासनाला नव्याने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दृष्टीने मंगळवारपासून प्रशासन कामाला लागले आहे. १७ मे पर्यंत प्रारूप आराखडा आयोगाला सादर करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. नियोजित वेळेत आराखडा तयार न झाल्यास मनपाकडून आणखी वेळ वाढवून मागितला जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक