शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:22 IST

याप्रकरणी सूर्यवंशी यांची बाजू मांडताना यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी विनंती केली होती.

छत्रपती संभाजीनगर: परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यूप्रकरणी आता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी गुरुवारी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. याप्रकरणी सूर्यवंशी यांची बाजू मांडताना यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी विनंती केली होती.

परभणी येथील न्यायालयीन कोठडीत मरण पावलेले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले. या आदेशानुसार परभणी पोलिसांनी अज्ञांताविरोधात गुन्हा नोंदविला. या प्रकरणात सोमनाथची आई विजया सुर्यवंशी यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी झाली. ॲड. प्रकाश आंबेडकर हे या प्रकरणांत सुर्यवंशी यांची बाजू मांडत आहेत. खंडपीठात सरकारकडून सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषन विभागाच्या (सीआयडी)उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तपास सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदन करण्यात आले.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाने विशेष तपास पथक नियुक्त करावे, अशी विनंती यापूर्वी केली होती. या विनंतीवरून सरकारतर्फे सांगण्यात आले की, बदलापूर प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश होते. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी पथक स्थापन केले होते. याप्रकरणातही खंडपीठाने पोलीस महासंचालकांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाकडून मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :parabhaniपरभणीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर