वर्षअखेरीस आॅरिकमध्ये येणार मोठा उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:59 IST2017-09-09T00:59:21+5:302017-09-09T00:59:21+5:30

सरत्या वर्षअखेरपर्यंत औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिपमध्ये मोठा उद्योग येणार असल्याचा दावा दिल्ली, मुंबई, इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

The big industry that will come to Arik at the end of the year | वर्षअखेरीस आॅरिकमध्ये येणार मोठा उद्योग

वर्षअखेरीस आॅरिकमध्ये येणार मोठा उद्योग

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सरत्या वर्षअखेरपर्यंत औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिपमध्ये (आॅरिक) मोठा उद्योग येणार असल्याचा दावा दिल्ली, मुंबई, इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
येणारा उद्योग आॅटो, इलेक्ट्रिक, फूड अथवा अन्य उत्पादन क्षेत्राशी निगडित असेल; परंतु उद्योग येईल हे मात्र निश्चित, असेही त्यांनी स्पष्ट केले. किया मोटार्स का गेले हे माहिती नाही. शेवटी गुंतवणूकदारांची मर्जी असते. एलजीचा प्लांट नागपूरला जाण्यामागे पाणी हे मुख्य कारण आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तयार नसल्यामुळे उद्योग येत नाहीत, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा दावाही त्यांनी केला.
‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र, इन्व्हेस्ट मराठवाडा’ या औद्योगिक गुंतवणूक परिषदेसाठी ते औरंगाबदेत आले होते. यावेळी उद्योजक ऋषी बागला, डीएमआयसीचे गजानन पाटील, सीआयआयचे निनाद करपे, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, रणजित कक्कड यांची उपस्थिती होती.
विक्रमकुमार म्हणाले, आॅरिक काय आहे, हे बºयाच गुंतवणूकदारांना माहिती नाही. त्यामुळे देश व विदेशात मार्केटिंगवर फोकस करण्यात येणार आहे. सप्टेंबर २०१८ पर्यंत आॅरिकच्या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होईल. येणाºया वर्षभरात गुंतवणूकदारांच्या आॅरिकला भेटी वाढतील. पुणे, हरियाणा, गुडगावमध्ये आॅरिकमध्ये गुंतवणुकीच्या उद्देशाने रोड शो केले. इंडस्ट्रीयल सेक्टरशी निगडित ५०० संघटना आहेत. त्यांनाही आॅरिकच्या मार्केटिंगसाठी हाताशी धरले आहे. सीबीआयएईचे २२ हजार उद्योजक सदस्य आहेत. त्याचा फायदा आॅरिकमध्ये गुंतवणुकीसाठी होईल. हनीवेल या कंपनीला १४० कोटींचे कंत्राट आॅरिकमधील आयसीटीसाठी दिले आहे. तसेच शापूर्जी अ‍ॅण्ड पालनजीकडे प्रशासकीय इमारतीचे काम करीत असून, त्यांच्याकडे अंतर्गत रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ४ वर्षांसाठी असेल, तोपर्यंत त्यांची काही रक्कम अदा करण्यात येणार नाही. हनीवेल ही कंपनीदेखील काम पूर्ण झाल्यावर ५ वर्षे देखभाल करील, असा दावा त्यांनी केला.

Web Title: The big industry that will come to Arik at the end of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.