शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

इसिस आणि नक्षलींचा हिंसाचार रोखण्याचे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 18:58 IST

लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने उत्तम तयारी केल्याचा पोलीस महासंचालकांचा दावा 

औरंगाबाद : इसिस आणि नक्षली विचाराने प्रभावित होऊन दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना शोधून त्यांचे मनसुबे धुळीस मिळविण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे. इसिस आणि नक्षली विचाराने प्रभावित होणाऱ्या तरुणांचे समपुदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करीत असून, यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाच्या तयारीचा आढावा बैठकीसाठी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे औरंगाबादेत आले होते. पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि आठ जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि शहरातील उपायुक्तांची उपस्थिती होती. बैठकीनंतर जयस्वाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आजच्या बैठकीत मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची तयारी संबंधित पोलीसप्रमुखांकडून जाणून घेण्यात आली. निवडणुका होईपर्यंत पोलिसांना युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे. पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात गतवर्षी लहान-मोठ्या चार दंगली झाल्या होत्या, या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील निवडणुकीसाठी जास्त पोलीस बल देणार का, असे विचारले असता महासंचालक म्हणाले की, पोलीस आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना हवे तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. मराठवाड्यातील कोणता मतदारसंघ तुम्हाला संवेदनशील वाटला, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. राज्यात दोन जातींमध्ये तेढ निर्माण करून निवडणूक कालावधीत वातावरण खराब करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याबाबतचा गुप्तचर संस्थांकडून काही अहवाल आला आहे का, या प्रश्नाचे थेट उत्तर न देता त्यांनी गुप्तचर यंत्रणांकडून येणाऱ्या अहवालांवर आम्ही कार्यवाही करीत असतो, असे सांगितले.

पदानवत केलेल्या उपनिरीक्षकांबाबत माहिती घेतो२०१३ मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे चौदा हजार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावरून पदावनत करण्यात आले आहे. त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी कायमस्वरूपी पदस्थापना कधी देणार, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, हा विषय मला माहिती नाही, मला माहिती घेऊ न अभ्यास करावा लागेल.

लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात होईल लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात व्हावी, यासाठी पोलीस यंत्रणा समर्थ आणि सज्ज आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काय करावे, याबाबतच्या सूचना याआधीच पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, नाकाबंदी करणे, हॉटेल्स, वाहने आणि लॉजेची तपासणी करणे आदी कामे सुरू करण्यात आली.

सोशल मीडियाविषयी तक्रार आल्यास कारवाईलोकसभा निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामुळे सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन केला आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना महासंचालक म्हणाले की, सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह मजकूर कोणी टाकला आणि याबाबत तक्रार आली तर पोलिसांकडून कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबाद