शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

वाळू माफियांचे कंबरडे मोडले; २३ दिवसांत पैठण तहसीलने ठोठावला दीड कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 18:14 IST

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल अधिकारी लाखोच्या रकमेचा दंड आकारीत असल्याने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. 

- संजय जाधव

पैठण ( औरंगाबाद ) : पैठण तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफिया विरोधात जोरदार कारवाईचे सत्र सुरू केले आहे. मागील २३ दिवसात वाळू माफियांना १ कोटी ४९ लाख ६९ हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे. यातील ५ लाख ८७ हजार ५०० रू दंड वसुल करण्यात आल्याचे प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी सांगितले.

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल अधिकारी लाखोच्या रकमेचा दंड आकारीत असल्याने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे.  दुसरीकडे किरकोळ अवैध वाळू वाहतुकीने मात्र गोदावरी पात्रात धुमाकूळ घातला आहे. या वाळू वाहतुकीस महसूल विभागाने वेसन घालावी अशी मागणी होत आहे. अवैध वाळू वाहतुक संदर्भात कारवाई करताना वाहनधारकास दंडाची रक्कम लावण्यासाठी राज्य शासनाने नवीन सूचना दिल्या असून वाहन पकडल्यास या नियमानुसार लाखो रूपयाच्या आसपास दंड आकारला जात आहे. 

एकदा वाहन पकडले तर महिनाभर केलेल्या अवैध वाळू व्यवसायाचा नफा तोटा एक होत असल्याने वाळू माफियाची हिंमत खचली असल्याचे दिसून येत आहे.  उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी २० डिसेंबर, २०२१ ते १२ जानेवारी २०२२  या २३ दिवसात वाळू माफियांवर कारवाईकरून जवळपास दीड कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. 

असा केला वाळू माफियांना दंड वसूल : - गणेश दत्तात्रय शिंदे /राजु गुलाब चव्हाण, रा. बिडकीन  वाहन क्रमांक एमएच.२०.ईएल. ७१८३ (वाळू) या दोघांना १ लाख ३७ हजार ५०० रूपये दंड ठोठावण्यात आला असून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.  - परसराम अर्जुन खोपडे रा. वडवाळी यांचा  हायवा ट्रक. एमएच.४४.डिके. ८३०१ ( मुरूम) यांना २,३०,००० हजाराचा दंड ठोठावण्यात आला , दंडाची रक्कम पूर्ण वसूल करण्यात आले. - राजू शिवाजी नजन रा चितेगाव राजू शवाजी नजन रा. चितेगाव टेम्पो क्रमांक एमएच.०४.एफबी. ३७३० (दगड) यांना १,१०,००० दंड आकारण्यात आला होता. पूर्ण रक्कम वसूल करण्यात आली आहे. - अरूण बाबासाहेब नजन रा. चितेगाव टेम्पो क्रमांक एमएच.४६.इ.३९९७ (दगड) यांना १,१०,००० रू दंड आकारून वसूल करण्यात आला. या प्रमाणे एकूण ५ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

दंडाची रक्कम न भरणारे वाळू माफिया : - शिवाजी शेषराव ईथापे,  रा.लोहगाव यांचे जेसीबी मशीन क्रमांक  एम एच.२० सी यु.५२३० ( मुरूम) यांना  ५०,३१,०००  रूपये दंड ठोठावण्यात आलेला असून त्यांनी अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. - ज्ञानेश्वर ढगे  रा. बिडकीन हायवा ट्रक क्रमांक  एमएच.२१.बीएच.२२४७ यांना ४४ लाख ८१ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला, तर ट्रक्टर क्रमांक एमएच २० एएस.६८१४ (वाळु) या वाहनासाठी १,३०,००० हजार व ट्रक्टर क्र. एमएच.२०.ईइ.२९८५ (वाळु) या वाहनासाठी १,३०, ००० हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी कोणताच दंडाची रक्कम ढगे यांनी भरलेली नाही.  - स्वप्नील चव्हाण रा पैठण ट्रक्टर क्रमांक एम एच.२०.एवाय. ३४४१ (वाळू) यांना  १,३०,०००  रू दंड आकारलेला असून दंड भरण्यात आलेला नाही. - सोमनाथ चंद्रभान सोनवणे रा चितेगाव जेसीबी मशीन एम एच २० इ वाय ५०७४ (वाळू) २२,५०,००० रूपये दंड लावण्यात आला असून अद्याप पूर्ण रक्कम अद्त्त आहे.  - बाबुराव शिवाजी बढे, रा. पाथर्डी  ट्रक क्रमांक एमएच १६ सीसी ६८९१ (वाळू) यांना ३,५०, ००० रूपये दंड ठोठावण्यात आलेला आहे. - ईसारवाडी येथील कृष्णा रामराव बोबडे यांना हायवा ट्रक क्रमांक एम एच.२० सीटी ६३७६ ( मुरूम) या  वाहनावर २,३०,०००  रूपये, हायवा ट्रक क्रमांक एम एच २० सीटी ५२१९ (मुरूम) या वाहनासाठी २,३०,००० रूपये,  जेसीबी मशीन विना क्रमांक ( चेसीस नं.  एमओ.९०४१७९) मुरूम साठी ७,८०,००० रूपये,  ट्रक्टर क्रमांक  एम एच. २०- ४२५० (वाळू) या वाहनासाठी १,३०,००० रूपये, ट्रक्टर क्रमांक एमएच.२०.एवाय.७५७३ ( वाळू) या वाहना साठी १,३०,०००, हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. याशिवाय ट्रक क्रमांक  एमएच.२० डिई ५०६५ ( वाळू)  या वाहनासाठी ३,८०,००० हजार रूपये दंड ठोठावण्यात आलेला आहे. मात्र बोबडे यांनी दंडाची रक्कम भरलेली नाही.

दंड न भरल्यास पुढील कारवाई दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी संबंधिताना नोटीस बजावण्यात आली आहे. ही सर्व वाहने तहसील प्रशासनाच्या ताब्यात आहेत. मुदतीत दंड न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीsandवाळू