बीडकरांच्या आरोग्याची नगर परिषदेने घेतली दखल
By Admin | Updated: May 8, 2014 00:02 IST2014-05-08T00:02:08+5:302014-05-08T00:02:19+5:30
बीड : बीड शहरातील सुमारे चार लाख लोकांना न.प.कडून दूषितपाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मधून मंगळवारी प्रकाशित करण्यात आले होते.

बीडकरांच्या आरोग्याची नगर परिषदेने घेतली दखल
बीड : बीड शहरातील सुमारे चार लाख लोकांना न.प.कडून दूषितपाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मधून मंगळवारी प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अशुद्ध पाणी पुरवठा करणार्या ईट येथील जलशुद्धीकर प्रकल्पाची पाहणी करून हा प्रकल्प स्वच्छ करून घेतला. बीड तालुक्यातील ईट जवळील २४ दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असणार्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून बीड शहराला अशुुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ‘चार लाख लोकांच्या आरोग्याशी खेळ’ या मथळ्याखाली मंगळवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी व्ही.बी.निलावाड, अभियंता एम.एस.वाघ, पी.आर.दुधाळ यांनी आपल्या चमूसह बीड तालुक्यातील बिंदुसरा तलावाची पाहणी केली. याची पाहणी केल्यानंतर निलावाड यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांना सोबत घेऊन ईट जवळील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट दिली. बीड शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. जलशुद्धीकरण प्रकल्प साफसफाई करून नियमीत ब्लिचींग पावडर वापरण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्याधिकारी व्ही.बी.निलावाड यांनी सांगितले. जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी काही मोनोब्लॉक (छोट्या मोटारी) गंजलेल्या स्थितीत आढळून आल्या होत्या. या मोटारीही एक महिन्याच्या आत बदलण्यात येणार असल्याचे अभियंता वाघ यांनी सांगितले. २५ किलो ब्लिचींग पावडर वापरण्याचे दिले आदेश बिंदुसरा प्रकल्प यावर्षी ओव्हरफ्लो न झाल्याने तलावातील घाण बाहेर निघाली नाही. निलावाड यांनी तलावाची पाहणी केल्यानंतर येथे प्रत्येक आठ तासाला २५ किलो ब्लिचिंग पावडर वापरण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.(प्रतिनिधी) जलशुद्धीकरण केले शुद्ध प्रकल्पास भेट दिल्यानंतर निलावाड, वाघ, दुधाळ यांनी तेथील कर्मचार्यांकडून फिल्टर शुद्ध करून घेतले. तसेच आठ तासाऐवजी सहा तासाला फिल्टरची सफाई करावी, अशा सूचना दिल्या.