बीदर-मुंबई रेल्वेचा रिमोटव्दारे प्रारंभ
By Admin | Updated: February 10, 2015 00:30 IST2015-02-10T00:01:44+5:302015-02-10T00:30:55+5:30
उदगीर : बीदर ते मुंबई रेल्वेगाडीचे अधिकृत वेळापत्रक सोमवारी रेल्वे बोर्डाने जाहीर केले आहे़ त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला येथून दुपारी

बीदर-मुंबई रेल्वेचा रिमोटव्दारे प्रारंभ
उदगीर : बीदर ते मुंबई रेल्वेगाडीचे अधिकृत वेळापत्रक सोमवारी रेल्वे बोर्डाने जाहीर केले आहे़ त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला येथून दुपारी ३़३० मिनिटांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दिल्लीतून रिमोटव्दारे रेल्वेचा शुभारंभ करणार आहेत़ तसेच ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४़३० वा़ या गाडीचा बीदर येथूनही झेंडा दाखविला जाईल़
बीदर ते मुंबई रेल्वे गाडी क्ऱ ११०७५ (तात्पुरता गाडी क्ऱ ०१०७५) चा शुभारंभ १० फेब्रुवारी रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीतून रिमोटव्दारे शुभारंभ होणार आहे़ शुभारंभाची गाडी नियोजित १२ ऐवजी दुपारी ३़३० वा़ सुटणार असून सकाळी ७ वाजता बीदरला पोहोचणार आहे़ बीदरहून गाडी क्ऱ ११०७६ (तात्पुरता गाडी क्ऱ ०१०७६) चा शुभारंभ सायं़ ४़३० वा़ केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दिल्लीतून रिमोटव्दारे शुभारंभ करणार आहेत. यावेळी बीदरचे खासदार भगवंत खुब्बा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे़ दरम्यान, लातूरचे खासदार डॉ़ सुनिल गायकवाड हे उदगीर येथे उपस्थित राहून बीदरहून येणाऱ्या रेल्वेगाडीचे स्वागत करणार आहेत़ (वार्ताहर)