दुचाकी चोरणारा जेरबंद
By Admin | Updated: November 10, 2014 23:57 IST2014-11-10T23:48:00+5:302014-11-10T23:57:17+5:30
उस्मानाबाद : शहरासह ग्रामीण भागातील दुचाकी चोरी प्रकरणात एकास दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले असून, त्याच्याकडील सात दुचाकी जप्त करण्यात आल्या

दुचाकी चोरणारा जेरबंद
उस्मानाबाद : शहरासह ग्रामीण भागातील दुचाकी चोरी प्रकरणात एकास दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले असून, त्याच्याकडील सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़ ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली़
पोलिसांनी सांगितले की, उस्मानाबाद तालुक्यातील पोहनेर येथील चंद्रकांत महादेव चौरे यांनी २८ आॅक्टोबर रोजी रात्री त्यांची दुचाकी (क्ऱएम़एच़२५- वाय़६५३५) ही घरासमोरून लावली होती़ मात्र, सदरील दुचाकी मध्यरात्री चोरट्यांनी लंपास केली़ या प्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात दुचाकी चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ शहरासह ग्रामीण भागातील दुचाकी चोरी प्रकरणातील चोरट्यांचा दरोडा प्रतिबंधक पथकाचे अधिकारी, कर्मचारी शोध घेत होते़ त्यावेळी दुचाकी चोरी प्रकरणात हातलादेवी परिसरात राहणाऱ्या अनिल फुलचंद काळे याने दुचाकींची चोरी करून इतरत्र विकल्याची माहिती मिळाली होती़ या माहितीवरून पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अप्पर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, स्थागुशाखे पोनि माधव गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोउपनि भास्कर पुल्ली व त्यांचे सहकारी पोहेकॉ मधुकर घायाळ, तानाजी माळी, मोईज काझी, पोना वाहेद मुल्ला, प्रफुल्ल ढगे, नाना भोसले, सुनिल कोळेकर, चालक काका शेंडगे यांनी सापळा रचून अनिल काळे याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीबाबत माहिती दिली़ या माहितीनंतर पोलिसांनी पोहनेर येथून सात दुचाकी जप्त केल्या़ असा एकूण दोन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़
काळे याच्याकडून इतर दुचाकी चोरी प्रकरणातील माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ काळे यास उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, तपास पोना मिलिंद साकळे हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)
हस्तगत केलेल्या गाड्यांचे असे आहेत नंबर
पकडण्यात आलेल्या दुचाकीचे चेसी व इंजिन नंबर पुढील प्रमाणे आहेत़ १़) चेसी नंबर एम़बी़एल़एच़ए़ १० ई़झेड़बी़एच़ई़ १३८३१ व इंजीन नंबर एच़एच़१० ई़एफ़बी़ एच़ई १५ ७१० २़) चेसी नंबर एम़ई़१५४ बीझेडओ २३३९५ इंजीन नंबर ५४ बी़ १०२३३९७ ३़) चेसी नंबर एम़ई़४ जे़सी़३६६जी ९८२९६७२५ इंजीन नंबर जे़सी़३६ ई़९४५०५८६ ४़) चेसी नंबर ०७ एल़०५ सी़२०६३३ इंजीन नंबर ०७एल ०५एम़२५४६५ ५़) चेसी नंबर एम़डी़२ ए़५१ बी़झेड़एक्स़डी़ डब्ल्यू़ डी़ १५६४७ व इंजीन नंबर पी़ए़झेड़डब्ल्यू़डी़बी़५५ ७३०७ हे क्रमांक असल्याचे पोलिसांनी सांगितले़