सायकल वाटप थांबविले

By Admin | Updated: August 2, 2014 01:43 IST2014-08-02T01:36:10+5:302014-08-02T01:43:24+5:30

औरंगाबाद : महापालिकेने निविदेत वेगळी सायकल पाहिली आणि खरेदी दुसरी केल्यामुळे सुमारे १० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय येत आहे.

Bicycle allocation stopped | सायकल वाटप थांबविले

सायकल वाटप थांबविले

औरंगाबाद : महापालिकेने निविदेत वेगळी सायकल पाहिली आणि खरेदी दुसरी केल्यामुळे सुमारे १० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय येत आहे. सभापती विजय वाघचौरे यांनी आज सायकल वाटप थांबविण्याची मागणी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
२३ लाख ७५ हजार २२० रुपयांच्या ६१६ सायकली आहेत. २३०० रुपये त्या सायकलची किंमत असावी, असा अंदाज असून, त्या सर्व सायकली १४ लाख रुपयांत आल्या असतील.
९ लाख ४९ हजार रुपये मनपाने जास्तीचे खर्च केल्याचे दिसते. २३०० रुपयांच्या किमतीनुसार सायकली खरेदी केल्या असत्या, तर अंदाजे १ हजार सायकली आल्या असत्या. तीन ते साडेतीन हजार रुपये किमतीत चांगली बॅ्रण्डेड सायकल येते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी वर्तविला.
खरेदीत १० लाखांचा घोटाळा
महापालिकेने निविदेमध्ये वेगळी सायकल पाहिली आणि खरेदी दुसरी केल्यामुळे सुमारे १० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय येत आहे. २३ लाख ७५ हजार २२० रुपयांच्या ६१६ सायकली आहेत.
२३०० रुपये त्या सायकलची किंमत असावी, असा अंदाज असून, त्या सर्व सायकली १४ लाख रुपयांत आल्या असतील. ९ लाख ४९ हजार रुपये मनपाने जास्तीचे खर्च केले की ती सर्व रक्कम पालिकेतील यंत्रणेने मिळून स्वाहा केली. यावरून सेनेतच अंतर्गत वाद सुरू झाला आहे.
आल्या असत्या १ हजार सायकली
२३०० रुपयांच्या किमतीनुसार सायकली खरेदी केल्या असत्या, तर अंदाजे १ हजार सायकली आल्या असत्या.
तीन ते साडेतीन हजार रुपये किमतीत चांगली बॅ्रण्डेड सायकल येत असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मनपाच्या सायकली व बाजारातील सायकलींच्या दरात मोठी तफावत आहे.

Web Title: Bicycle allocation stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.