बिब्याचे तेल तोंडावर फेकले

By Admin | Updated: September 5, 2014 00:08 IST2014-09-04T23:54:48+5:302014-09-05T00:08:36+5:30

कंधार : आपआपसातील वैमन्यसातून बिब्याचे तेल फेकून एकाचा चेहरा विद्रूप करण्याची घटना ३ सप्टेंबर रोजी मौजे कौठा ता. कंधार येथे घडली.

Biba's oil thrown in the mouth | बिब्याचे तेल तोंडावर फेकले

बिब्याचे तेल तोंडावर फेकले

कंधार : आपआपसातील वैमन्यसातून बिब्याचे तेल फेकून एकाचा चेहरा विद्रूप करण्याची घटना ३ सप्टेंबर रोजी मौजे कौठा ता. कंधार येथे घडली.
फिर्यादी पांडुरंग टोकलवाड व त्यांचे मित्र हे विठ्ठल टोकलवाड यांच्या घरासमोर झोपलेले होते. ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ च्या दरम्यान आरोपी शिवाजी सूर्यकांत करडे याने ‘तुम्ही माझ्या मुलासोबत का राहता’ असे म्हणून बाजूस असणारे सयाजी चोपवाड यांच्या भट्टीतील बिब्याचे गरम तेल पांडुरंग व त्यांच्या मित्राच्या चेहऱ्यावर फेकले. यात दोघांचेही चेहरा, छाती, डोळे विद्रूप होऊन गंभीर दुखापत झाली.
याप्रकरणी पांडुरंग टोकलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंधार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. फौजदार पठाण तपास करीत आहेत.
(वार्ताहर)
धर्माबाद, रिठातांडा येथे अवैध दारु विक्री,गुन्हा दाखल
धर्माबाद/इस्लापूर : या पोलिस ठाण्यातंर्गंत येणाऱ्या परिसरातून पोलिसांनी अवैध दारु विक्री करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. बासर - धर्माबाद रस्त्यावर आरोपी संदीप यलप्पा देवकर हा अवैध दारु विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ३ सप्टेंबर रोजी दुपारी स्थागुशाचे सपोउपनि सय्यद फईम सय्यद अहेमद यांनी आरोपीला रंगेहाथ पकडून ५ हजार ९८० रुपयांची दारु जप्त केली. याप्रकरणी धर्माबाद पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. तपास जमादार वाघमारे करीत आहेत. इस्लापूर पोलिस ठाण्यातंर्गंत येणाऱ्या रिठातांडा येथे आरोपी रामदास बरगे याच्या ताब्यातून १ हजार रुपयांचे २० लिटर मोहफुलाचे रसायन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी जमादार सुदाम आलेवार यांनी इस्लापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. दुसऱ्या एका घटनेत आरोपी इंदल राठोड याच्या ताब्यातून १५०० रुपयांचे ३० लिटर मोहफुलाचे रसायन पोलिसांनी जप्त केले. जमादार आलेवार तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Biba's oil thrown in the mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.