देगलूर शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

By Admin | Updated: August 13, 2014 00:46 IST2014-08-13T00:38:12+5:302014-08-13T00:46:01+5:30

देगलूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत देगलूर शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या कामाचे भूमिपूजन झाले.

Bhumibhujan of Deglur city's improved water supply scheme | देगलूर शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

देगलूर शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

देगलूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत देगलूर शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा वंदना कांबळे यांच्या हस्ते झाले.
सुधारित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत करडखेड येथे नवीन जलशुद्धीकरण यंत्रणा, करडखेड ते देगलूर अशी १२ कि. मी. अंतरापर्यंत जलवाहिनी (पाईपलाईन बदलणे, शहरांतर्गत वसाहतीमध्ये पाणी पुरवठ्यासाठी २५ कि. मी. अंतराची जलवाहिनी बसविणे आणि विविध भागामध्ये योग्य दाबाने पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी आणखी चार जलकुंभ (पाण्याची टाकी) बांधणे या घटकांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत येथील छत्रपती शिवाजी उद्यानात आणखी एक जलकुंभ बांधण्यात येत असून या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा वंदना कांबळे यांच्या हस्ते उपाध्यक्ष बालाजी रोयलावार यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात झाले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश देशमुख, तालुकाध्यक्ष शिवाजीराव बळेगावकर, मधुकर नारलावार, दत्तुअण्णा जोशी, माधवराव पाटील सुगावकर, शैलेंद्र चौव्हाण, नंदु शाखावार, धनंजय देशपांडे, अ‍ॅड. तहसीन अली काझी, आसिफ पटेल, संजय मंगलावार, बालाजी गरुडकर, राष्टंं्रवादीचे सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी रामदास पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Bhumibhujan of Deglur city's improved water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.