शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आचारसंहिता संपताच महापालिकेच्या २ हजार कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 5:48 PM

बहुचर्चित नवीन पाणी पुरवठा योजनेला शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

ठळक मुद्देसफारी पार्कच्या कामाचे भूमिपूजन१५२ कोटींच्या रस्त्यांचा मार्ग मोकळा होणार

औरंगाबाद : पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापालिका शहरात विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांपर्यंतची ही विकास कामे आहेत. बहुचर्चित नवीन पाणी पुरवठा योजनेला शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

शहराचा पाणी प्रश्न  सोडविण्यासाठी तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. त्यानंतर योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर  सोपविले.   प्राधिकरणाने अल्पावधीत कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. आता अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे फाईल प्रलंबित    आहे. 

सफारी पार्कच्या कामाचे भूमिपूजनमिटमिटा येथे सफारी पार्क उभारण्यात येणार आहे. सफारी पार्क शंभर एकर जागेवर संरक्षण भिंत उभारण्यासाठी स्मार्ट सिटीकडून निविदासुद्धा काढण्यात आलेली आहे. आचारसंहितेनंतर या कामाला सुरुवात होऊ शकते. 

१५२ कोटींच्या रस्त्यांचा मार्ग मोकळा होणारशहरातील रस्ते गुळगुळीत व्हावेत म्हणून राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. एमआयडीसी, महापालिका आणि रस्ते विकास महामंडळातर्फे रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी एमआयडीसीत ५० कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू केली. रस्ते विकास महामंडळ आणि महापालिकेने कामाचा श्रीगणेशा केलेला नाही. आचारसंहिता संपताच शासनाकडून निधीसुद्धा प्राप्त होणार आहे. 

बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानएमजीएम परिसरात २५ कोटी रुपये खर्च करून बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रकल्पामध्ये विशेष लक्ष घातलेले आहे. डिसेंबरमध्ये या कामाचा शुभारंभ होईल. 

१७६ कोटींचा एमएसआय प्रकल्पमास्टर सिस्टिम इंटिग्रेशन (एमएसआय) या प्रकल्पासाठी १७६ कोटींची तरतूद केली आहे. यातून सातशे सीसीटीव्ही कॅमेरे, ५० डिजिटल डिस्प्ले बोर्ड, महापालिका आणि पोलीस आयुक्तालयात कमांड कंट्रोल सेंटर, वाहतूक नियम फलक व झेब्रा क्रॉसिंग ही कामे होणार आहेत.  सीसीटीव्ही बसविण्याचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादfundsनिधी