वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:04 IST2021-07-03T04:04:11+5:302021-07-03T04:04:11+5:30

बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाईक यांच्या नावाने असलेल्या जागेवर गोर बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांच्या ...

Bhumi Pujan of Vasantrao Naik's memorial | वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाईक यांच्या नावाने असलेल्या जागेवर गोर बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांच्या पुढाकाराने हे भूमिपूजन वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त झाले. प्रारंभी सेवालाल महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाला बीड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब राठोड, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रविराज राठोड, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मुकेश राठोड, जिल्हा सचिव संतोष राठोड, औरंगाबाद तालुका अध्यक्ष नितेश राठोड, पैठण तालुका अध्यक्ष संजय पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष पवन चव्हाण, शहर उपाध्यक्ष विकास राठोड, सोनू पवार, प्रकाश पवार आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ. मुकेश राठोड यांनी केले तर आभार जिल्हा समन्वयक बळी राठोड यांनी मानले.

Web Title: Bhumi Pujan of Vasantrao Naik's memorial