गंगापुरात आज ४५ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:04 IST2021-07-02T04:04:01+5:302021-07-02T04:04:01+5:30

आमदार बंब यांच्या प्रयत्नाने गंगापूर नगरपालिकेने ४५ कोटी ३ लाख ९० हजारांची विविध योजनेतील शहरासाठी वरदान ठरणारी महत्त्वापूर्ण अशी ...

Bhumi Pujan of various development works worth Rs 45 crore in Gangapur today | गंगापुरात आज ४५ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

गंगापुरात आज ४५ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

आमदार बंब यांच्या प्रयत्नाने गंगापूर नगरपालिकेने ४५ कोटी ३ लाख ९० हजारांची विविध योजनेतील शहरासाठी वरदान ठरणारी महत्त्वापूर्ण अशी २५ विकास कामे मंजूर केली आहे. यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोफत अभ्यासिका हॉल, मुख्य बाजारतळात ओटा बांधणी व शेडबांधणी, एकाच छताखाली सर्व कार्यालयाची इमारत बांधकाम, मुस्लीम कब्रस्थान स्वच्छतागृह व सुशोभीकरण, दलित स्मशानभूमी बांधकाम, नृसिंह मंदिर उद्यान सुशोभीकरण, संत सेना महाराज सभागृह, कायगाव रोडवरील व्यायामशाळा, सावता महाराज सभागृह, शहरातील महापुरुषांच्या नावाने असलेल्या चौकांचे सुशोभीकरण, शिवाजी नगर येथील उद्यान तसेच शहरातील विविध सिमेंट रस्त्याच्या कामांचा समावेश आहे. कोरोनामुळे घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करून सकाळी ९ ते दुपारी ३ च्या दरम्यान या सर्व कामांचे भूमिपूजन व उद्घाटन विविध क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Web Title: Bhumi Pujan of various development works worth Rs 45 crore in Gangapur today