खांडी पिंपळगाव येथे मारोती मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST2021-06-28T04:04:56+5:302021-06-28T04:04:56+5:30

खांडी पिंपळगावात प्राचीन मारोती मंदिर आहे. त्यामुळे या मंदिराला विशेष असे महत्त्व असून, जिल्ह्याभरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. या ...

Bhumi Pujan of Maroti Mandir Sabhamandap at Khandi Pimpalgaon | खांडी पिंपळगाव येथे मारोती मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन

खांडी पिंपळगाव येथे मारोती मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन

खांडी पिंपळगावात प्राचीन मारोती मंदिर आहे. त्यामुळे या मंदिराला विशेष असे महत्त्व असून, जिल्ह्याभरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. या ठिकाणी मंदिर परिसरात सभामंडप करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे केली होती. आमदार स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध मंजूर झाला असून, आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. खांडी पिंपळगाव येथील मारोती मंदिराचा इतिहास पाहता याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळायला हवा. तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास या भागाचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष महेश उबाळे, तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, किशोर कुकलारे, माजी सरपंच अशोक उबाळे, महेश महालकर, बंडू श्रीखंडे, विष्णू चव्हाण, जगन्नाथ चव्हाण, मिठू महालकर, ज्ञानेश्वर दुधारे, केदार कोकणे, पोपट काळे, रमजान पठाण, भरत कोकणे, संजय काळे, विजय कोकणे, रमेश महालकर यांची उपस्थिती होती.

---

---------------------------------------------------

Web Title: Bhumi Pujan of Maroti Mandir Sabhamandap at Khandi Pimpalgaon