सभापती चव्हाण यांच्या निधीतून गणोरी गटात विकासकामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:05 IST2021-09-27T04:05:57+5:302021-09-27T04:05:57+5:30
तालुक्यातील पिंपळगाव वळण ते शिताबाई वाडी रस्त्याला २५ लाख रुपये, तर पिंपळगाव वळण ते केजभट वस्तीसाठी २० लाख ...

सभापती चव्हाण यांच्या निधीतून गणोरी गटात विकासकामांचे भूमिपूजन
तालुक्यातील पिंपळगाव वळण ते शिताबाई वाडी रस्त्याला २५ लाख रुपये, तर पिंपळगाव वळण ते केजभट वस्तीसाठी २० लाख रुपये जिल्हा परिषदेकडून मंजूर झालेले आहेत. या दोन्ही कामांचा प्रारंभ रविवारी करण्यात आला. कोविड काळात जि. प.कडे निधीची कमतरता असतानाही प्रयत्न करून निधी मंजूर करून घेतल्याची माहिती अनुराधा चव्हाण यांनी दिली. येत्या काळात आणखी दोन कोटी रुपयांच्या कामांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी महावितरणने ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा बंद केला. वास्तविक पाहता १४ व्या वित्त आयोगातून महावितरणला २५ टक्के पैसा हा प्रत्येक ग्रा.पं.कडून कपात केलेला असताना वीज पुरवठा बंद करणे चुकीचे असल्याचे चव्हाण यांनी सांगितले, तर आमदार निधीतूनही विकासकामे केली जातील, असे आश्वासन आ. हरिभाऊ बागडे यांनी दिले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुहास शिरसाट, पं. स. सभापती सविता फुके, जि. प. सदस्य जितेंद्र जयस्वाल, ऐश्वर्या गाडेकर, योगेश मिसाळ, नरेंद्र देशमुख, कैलास सोनवणे, सुचित बोरसे, मंगलाबाई वाहेगावकर, सरपंच ताराबाई गायकवाड, कृष्णा गावंडे, रेखा वहाटुळे, रवींद्र गायकवाड.
फोटो :