‘बीएचआर’च्या संचालकांना कोठडी

By Admin | Updated: March 27, 2015 00:39 IST2015-03-27T00:35:02+5:302015-03-27T00:39:39+5:30

उस्मानाबाद : मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतरही ग्राहकास पैसे न दिल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात ‘बीएचआर’ संस्थेच्या १२ संचालकांना पोलिसांनी बुधवारी अटक केली़

'BHR' directors detained | ‘बीएचआर’च्या संचालकांना कोठडी

‘बीएचआर’च्या संचालकांना कोठडी


उस्मानाबाद : मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतरही ग्राहकास पैसे न दिल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात ‘बीएचआर’ संस्थेच्या १२ संचालकांना पोलिसांनी बुधवारी अटक केली़ त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ़ पालकर यांनी ‘बीएचआर’ संस्थेच्या शहरातील शाखेत ६० हजार रूपये व ६५ हजार रूपयांची मुदत ठेव ठेवली होती़ पहिल्या मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतर मल्टीस्टेटकडे वारंवार पैशाची मागणी करूनही पैसे दिले नाहीत़ त्यामुळे संस्थेने आपली फसवणूक केल्याची फिर्याद डॉ़ पालके यांनी २० डिसेंबर २०१४ रोजी शहर पोलीस ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून संबंधित मल्टीस्टेट व संचालकांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
संस्थेचे संचालक दुसऱ्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अटक करण्यात आले होते़ ते जळगाव येथील कारागृहात असल्याने पोलिसांनी वॉरंट काढून बुधवारी प्रमोद भाईचंद रासोयनी, मोतीलाल ओंकार गिरी, दिलीप कांतीलाल चोरडीया, सुरजमल बभुमल जैन, यशवंत ओंकार गिरी, शेख मजान अब्दुल नबी, इंद्रकुमार आत्माराम लालवानी, जितेंद्र यशवंत महाजन, भगवान हिरामन वाघ, राजाराम काशीनाथ कोळी, भागवत संपत माळी, दादा रामचंद्र पाटील या बारा जणांना ताब्यात घेतले़ अटकेतील १२ जणांना उस्मानाबाद येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ तपास सपोनि मानभाव हे करीत आहेत़(प्रतिनिधी)

Web Title: 'BHR' directors detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.