जलपुर्नभरणाने दिले भोसलेंच्या घराला पाणीच पाणी!
By Admin | Updated: June 5, 2016 00:37 IST2016-06-05T00:21:00+5:302016-06-05T00:37:30+5:30
लातूर : नुस्ते बोअरचेच नव्हे... तर चक्क घराच्या सर्व मोकळ्या जागेत जलपुनर्भरण केलेल्या भोसले कुटुंबाला पाणीच पाणी आहे. एक बागही फुलली. त्यांच्या घरातल्या बागेत झाडे किती असावीत ?

जलपुर्नभरणाने दिले भोसलेंच्या घराला पाणीच पाणी!
लातूर : नुस्ते बोअरचेच नव्हे... तर चक्क घराच्या सर्व मोकळ्या जागेत जलपुनर्भरण केलेल्या भोसले कुटुंबाला पाणीच पाणी आहे. एक बागही फुलली. त्यांच्या घरातल्या बागेत झाडे किती असावीत ? तब्बल १०८ मोठी झाडे आणि चाळीस वेली. तर ९० रोपांची झाडे. पावसाचे तर मुरविलेच जाते, पण मॅजिक पिट यायच्या आधीपासून त्यांच्या घरातून वापरलेल्या पाण्याचा एक थेंबही गटारीत जात नाही. त्यांच्या या ‘पर्यावरण पूरक घरा’ची ही कथाच निऱ्हाळी.
दहा वर्षापूर्वी एमआयडीसीतील जिजामाता विद्यालयाच्या मागे जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. किशन आणि त्यांच्या पत्नी उषा भोसले यांनी घर बांधण्यासाठी जागा घेतली. घेतलेल्या जागेत एक झुडूप नव्हत. जुन्या जागेत बोअर होता पण त्याला पाणी नव्हते. जागेत भलामोठा खड्डा. तो जलपुनर्भरणाच्या फिल्टर मीडियाने भरला़ पावसाचे पाणी चोहोबाजूनी मुरुन त्यांचा बोअर जिवंत झाला आणि या उन्हाळ्यातही दररोज एक हजार लिटर पाणी मिळत आहे़ पावसाच्या पाण्याने घरचा स्विमिंग टँक भरला जातो. रोपांची निगा घरातला प्रत्येक माणूस घेतो. निवृत्त झाल्याने किशन भोसले त्यांच्या पत्नी उषा आणि गृहिणी सून मधुरा सारे बागेत दोन तास काम करतात. ही गोडी नातू सम्राटमध्ये उरलीय. हे कुटुंब चाफा, मोगऱ्याची रोपे बनवून वाढविण्याच्या अटीवर सर्वांना मोफत देते. किचनमधील भाज्यांचा कचरा गाई-म्हशीला. त्यांचे शेण झाडांना. तर केरही कुजविण्यासाठी घरामागे असलेल्या कंपोष्ट, गांडूळ खताच्या युनिटमध्येच जातो. (प्रतिनिधी)